कोपरगाव तालुका
ह. भ.प.अमृतराव कहांडळ यांचे निधन
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
संगमनेर तालुक्यातील देवकौठे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी अमृतराव काशिनाथ कहांडळ (वय-85) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर देवकौठे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.अमृतराव कहांडळ हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून देवकौठे व परिसरात परीचित होते.त्यांनी आपल्या हयातभर देवकौठे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनोभावे सेवा केली.सकाळची काकड आरती व सायंकाळचा हरिपाठ कोणत्याही स्थितीत त्यांनी कधीच चुकवला नाही.त्यांच्या बद्दल परिसरातील ग्रामस्थांत अतीव आदर होता.त्यांच्या अंत्यविधिसमयी नाशिक महापालिकेचे नगरसेवक भागवतराव आरोटे,राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे,संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष सांगळे,पोलीस पाटील श्री मुंगसे आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात,ह. भ.प.श्री गोपाळे महाराज,लक्ष्मण महाराज चौगुले यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.