कोपरगाव तालुका
परशराम शिनगर यांचे निधन
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी परशराम लहानु शिनगर (वय-85) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात एक भाऊ, पत्नी चार मुले, तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर भोजडे येथील शिनगर वस्तीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.स्व.परशराम शिनगर हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून भोजडे परिसरात प्रसिद्ध होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते भोजडे येथील जेष्ठ कार्यकर्ते भगवान शिनगर यांचे पिताश्री होते.त्यावेळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ.गुलाबराव वरकड,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नानासाहेब जवरे,विजयराव मुंगसे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.