कोपरगाव तालुका
धनादेश वटला नाही, कोपरगावात आरोपीस तीन महिन्याची शिक्षा
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जपोटी पतसंस्थेस एक लाखांचा धनादेश देऊन तो वटला नाही त्यामुळे पतसंस्थेने कोपरगाव येथील न्यायालयात फौजदारी खटला एस.एस.सी.83/2015 अन्वये दावा दाखल केला होता.व कर्जदाराविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती त्यात कर्जदार बाळू अंबादास घोडके हे दोषी आढळल्याने न्यायालयाने त्यांना तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा तसेच ज्योती सहकारी पतसंस्थेस एक लाख 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला असून त्यात कसूर केल्यास दहा दिवस अधिकचा कारावास ठोठावण्याची शिक्षा फर्मावली आहे.ज्याती पतसंस्थेच्या वतीने न्यायालयात विधीज्ञ एस .डी. काटकर यांनी काम पाहिले.