जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निळवंडे नडले,आ. कोल्हे पराभूत, अटीतटिच्या लढतीत आशुतोष काळे विजयी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत आ. स्नेहलता कोल्हे यांना निळवंडेची बंदिस्त जलवाहिनी चांगलीच नडली असून मतदारांनी त्यांच्या आभासी विकासाला स्पष्टपणे नाकारले असून कोपरगाव शहरासह ग्रामीण जनतेने त्यांना अनेक हेलकावे खात नाकारून राष्ट्रवादीचे मितभाषी व उपद्रवशून्य नेतृत्व आशुतोष काळे यांच्या पदरात 87 हजार 566 मतांची बेगमी करून 822 मतांनी विजयी केले आहे.या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून होते.त्यांचं विजयाचे त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले आहे.त्यामुळे जनशक्ती न्यूजने काळे यांच्या विजयाचा आदल्या दिवशी दिलेला अंदाज खरा ठरला आहे.तथापि दहिगाव बोलका येथील वीर जवान सुनील वलटे यांच्या अंत्यविधीमुळे मिरवणूक रद्द करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान गत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे व डॉ.मिलिंद कोल्हे यांनी कालवा कृती समिती समोर मतांसाठी लोटांगण घातले होते त्यावेळी समितीने दोन अटी ठेवल्या होत्या.एक,”आमचे एकही काम करायचे नाही अन, दुसरी “आम्ही जे काम करतो त्यात खोडा घालायचा नाही.” समितीने पाच वर्ष आपला शब्द जातीने पाळला मात्र कोल्हे यांनी मात्र निळवंडे धरणात व कालव्यांच्या बाबतीत बंद जलवाहिनीचा प्रताप करून हस्तक्षेप न करण्याचा शब्द देऊनही आपल्या शब्दाला हरताळ फासण्याची एकही संधी सोडली नाही.त्याची किमंत त्याना या निवडणुकीत चुकवावी लागली आहे.शब्द न पाळण्यात हे कुटुंब माहिर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोपरगांव विधानसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार दि.२४ आँक्टोबर रोजी सकाळी ०८ वाजेपासुन सेवानिकेतन काँन्व्हेंट स्कूल,पुर्वेकडील तळमजला हाँल,कोपरगांव येथे सुरु झाली असून सोमवार दि.२१ आँक्टोबर रोजी झालेल्या मतदानात २०१८७४ (७६.२४%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कोपरगांव विधानसभा मतदारसंघात एकुण १४ उमेदवार रिंगणात होते.त्यांचे भविष्य मतपेटीत 21 ऑक्टोबर रोजी बंद झाले होते.मतमोजणी केंद्रावर १४ टेबल लावले होते. मतमोजणीच्या २० फेऱ्यांच्या मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.त्यावेळी प्रारंभीच पहिल्याच फेरीत आशुतोष काळे यांनी 5457 मते मिळवून आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पेक्षा 494 मतांची आघाडी उघडली.त्यावेळी कोल्हे याना 4963 मते मिळाली होती.त्यांचा हा विजयरथ तिसऱ्या फेरी अखेर 2968 मतांनी पुढे होता.मात्र चौथ्या फेरीत मात्र आ. कोल्हे यांनी 1467 मतांची आघाडी मिळवून रोखला.तो अकराव्या फेरी अखेर 48860 मते मिळवून 855 मतांनी कायम होता.मात्र त्यानंतर चित्र नेमके उलटे झाले.व बाराव्या फेरी अखेर आशुतोष काळे यांनी 54 हजार 959 मते मिळवून 2314 मतांनी आ. कोल्हेंपेक्षा आघाडी घेतली.त्यावेळी आ. कोल्हे यांना 52 हजार 645 मते मिळाली होती.त्यानंतर तेराव्या फेरी अखेर ती आघाडी काळे यांनी टिकवून ठेवत ती 2040 अशी ठेवली होती.

दरम्यानच्या काळात अकराव्या फेरी नंतर माध्यमातील एका खोडसाळ इसमाने सामाजिक संकेतस्थळावर आ. कोल्हे या 18 हजार मतांनी आघाडीवर असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या त्याचा परिणाम असा झाला कि,कोल्हे समर्थकांनी आपले झेंडे फडकावून गुलालाची गावोगाव उधळण सुरु केली होती.अनेकांनी पेढेही वाटले,मात्र काही काळाने ती अफवाच असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

त्यानंतर चौदाव्या फेरी अखेर काळे यांनी आ. कोल्हे यांच्यापेक्षा 2419 मतांनी आघाडी घेतली.पंधराव्या फेरीत काळेंचीच आघाडी हि 2419 पर्यंत खाली आली.पंधराव्या फेरीतही तीच पुनरावृत्ती होऊन काळे यांचे मताधिक्य काहीसे म्हणजे 2271 या नीचांकी पातळीवर आले.ते सोळाव्या फेरीत कोपरगाव शहरातील मतदारांनी पुन्हा विस्मयकारक वाढवुन 3 हजार 515 मतानी जोरदार आघाडी उघडली ती परत आ. कोल्हे याना कमी करता आली नाही.सतराव्या फेरी अखेर काळे यांनी 77 हजार 669 मते मिळवून टिकवून ठेवली.त्या फेरीत त्याना 2414 मतांनी आघाडी घेतली.आठराव्या फेरीत आशुतोष काळे याना 82 हजार 295 मते मिळवून हे मताधिक्य 1 हजार 784 मतांवर येऊन निवडणुकीतील धडधड वाढवणारी ठरली असल्यास नवल नाही.

या निवडणुकीत अन्य उमेदवारांना मिळालेली मते या प्रमाणे माधव सखाराम त्रिभुवन(बसपा)-615,शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी) – 224, कोल्हे शीतल दिंगबर (हिंदुस्थान जनता पार्टी) – 275, अहिरे मगन पांडुरंग (अपक्ष) – 580, उकीर्डे सुदाम पंढरीनाथ (अपक्ष) – 123, काळे अशोक नामदेव (अपक्ष) – 244, राजेश सकाहारी परजने (अपक्ष) – 246, शहा अलीम छोटू (अपक्ष) – 337, साळुंके दीपक गणपतराव (अपक्ष)- 557, तर नोटाला (या पैकी एक ही नाही) 1622 मते मिळाली आहे, या निवडणुकी मध्ये आशुतोष अशोकराव काळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी विजयी घोषित केले आहे, यावेळी निवडणूक निरीक्षक हिमांशु चौधरी हे उपस्थित होते.

एकोणाविसाव्या फेरी अखेर आशुतोष काळे यांचे मताधिक्य हे अवघे 454 मतावर येऊन ठेपले होते.त्यामुळे विसाव्या फेरी अखेर काय होणार यामुळे सत्ताधारी गटाचे व काळे गटाचे कार्यकर्ते चिंतेत असताना नैऋत्येकडची दुष्काळी अकरा गावे आशुतोष काळे यांच्या मदतीला धावून आली. व त्या गावातून मताधिक्य मिळाल्याने हि आघाडी निर्णायक क्षणी 87 हजार 566 मते मिळून 822 मतांनी टिकवून ठेवण्यात आल्याने दुष्काळी गावांचा हा मदतीचा हात त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला तर त्यात आ. कोल्हे यांचा दुष्काळी गावांचे पाणी बंदिस्त जलवाहिणीद्वारे शिर्डी,कोपरगावला पळविणाऱ्या आ. स्नेहलता कोल्हे यांना दुष्काळी शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे.शेवटच्या फेरी अखेर आ. स्नेहलता कोल्हे याना 86 हजार 744 मते मिळाली तर अपक्ष राजेश परजणे याना 15 हजार 546 मते मिळाली आहे.तर अपक्ष कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांना 4047 मते मिळाली आहे.तर वंचितचे अशोक गायकवाड यांना 3914 मते मिळाली आहे.गतवेळी आ. कोल्हे या आशुतोष काळे यांच्यापेक्षा 30 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या होत्या ते मताधिक्य तोडून काळे यांचा हा विजय राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

दरम्यान या निवडणुकीत जनशक्ती न्यूज या न्यूज चॅनलने सत्ताधाऱ्यांच्या निळवंडे बंदिस्त जलवाहिनीच्या भुलथापांबद्ल निर्भीड व निर्णायक भूमिका निभावल्याने व जनतेला जागरूक केल्याने उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.तर काळे यांच्या बाबासाहेब रणशूर या उत्साही कार्यकर्त्यांने दुपारीच धारणगाव रस्त्यावरील नागरिकांना आशुतोष काळे विजयी होणार म्हणून पेढे वाटून टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या योगायोगा बदल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

या निवडणूकित निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,प्रशांत सरोदे यांनी निवडणूक यांनी लक्षवेधी नियोजन करून हा निकाल उशिरा म्हणजे सांयकाळचे सहा वाजवले होते.मात्र सर्व प्रक्रिया शांततेत व वादविरहित पार पाडली आहे.त्याबद्दल अनेकांनी त्याचे आभार मानले आहे.या वेळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close