जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…..आता त्यांना दाखवा जायकवाडी धरण-मनसे उमेदवार अलीम शहा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम नुकतीच संपली असून या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोण काय क्लुप्त्या करील काही सांगता येत नाही. कोपरगाव विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे उमेदवार अलीम छोटू शहा यांनी आपल्या प्रचारासाठी स्वतःच्या हाताने दोन हजार रुपये खर्चून बनवलेल्या व मानवी श्रमाने ओढत प्रचार केला असून स्वतः तब्बल सहा दिवस त्या गाडीस घेऊन मनसेच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केल्याने त्यांची चर्चा शहर व तालुकाभर रंगली आहे.त्यांनी आपल्या हात गाडीवर रंगवलेल्या घोषणा मतदारांचे लक्ष वेधून घेत होत्या त्यात या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला व निवडणुकी पूर्वी प्रत्यक्षात न आलेल्या निळवंडे धरणावरील बंद जलवाहिणीच्या पाण्याचा होता व त्या घोषणेत ,”निळवंडे धरणाचा दाखविला आशेचा किरण,आता त्याना दाखवा जायकवाडी धरण” या घोषणेने कहर उडवून दिलाच पण त्याची अचूक वेळ साधल्याने सर्वत्र या घोषणेने नागरिकांनी स्वागत केले आहे.

अलीम शहा यांनी आपल्या फलकावर त्यांनी निळवंडे धरणाच्या फसव्या घोषणेवर अचूक भाष्य केलेच पण ,”ठरवून असते… प्रस्थापितांची सत्ता,आता माझी…तर पुढे तूझी…मालमत्ता”,कोण म्हणतं चौरंगी लढत आहे,खलबत आणि मुसळी त्यांच्या विरोधात आहे.पाच वर्षांनी हात जोडून येतात,आणि त्या सालात तालुक्याचे वाटूळे करून जातात.आदी घोषणांनी नागरिकांच्या मनात घर केले नाही तर नवल.

कोपरगाव विधानसभेसाठी उद्या निवडणूक संपन्न होत आहे त्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली असून राज्यात निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी 350 केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह 3 लाख पोलीस तैनात केले आहेत.या निवडणुकीत 52.69 कोटींची रोकड,31.52 कोटींची दारू,60 किलो सोने,20.71 कोटींचे मादक पदार्थांसह एकूण 142 कोटींचा ऐवज जप्त केला आहे.प्रचार संपला असला तरी या निवडणुकीचे कवित्व पुढे अनेक दिवस सुरु राहणार आहे.कोपरगाव विधानसभा हि खऱ्या अर्थाने चौरंगी होत असली तरी यात चर्चेतील उमेदवार म्हणून आगामी काही काळ मनसेचे उमेदवार अलीम शहा यांचे नाव घेतले जाईल.कारण त्यांनी आपल्या प्रचारात नेमक्या वर्मावर बोट ठेवण्याचे धाडस दाखवले असून सहसा या विषयावर कोणी आपले लक्ष वेधून घेतले नव्हते.त्यांचे चिन्ह “खलबत्ता मुसळी” हे होते.आपल्या फलकावर त्यांनी निळवंडे धरणाच्या फसव्या घोषणेवर अचूक भाष्य केलेच पण ,”ठरवून असते… प्रस्थापितांची सत्ता,आता माझी…तर पुढे तूझी…मालमत्ता”,कोण म्हणतं चौरंगी लढत आहे,खलबत आणि मुसळी त्यांच्या विरोधात आहे.पाच वर्षांनी हात जोडून येतात,आणि त्या सालात तालुक्याचे वाटूळे करून जातात.आदी घोषणांनी नागरिकांच्या मनात घर केले नाही तर नवल !कोपरगावात डेंग्यूने थैमान घातले होते त्यावेळी कोपरगाव नगरपरिषद आपले काम करीत होतीच पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही सत्ताधारी पक्ष व त्यांचे नेते आपण काही करत असल्याचे नाटक रंगवत असताना अलीम शहा यांनी सदरच्या कार्यक्रमातील फोलपणाच सदर फवारणीचे पाणी पिऊन भर चौकात उघड केला होता.त्यावरही भाष्य करण्यास ते कचरले नाही.त्यानंतर नैऋत्य गडावरील गडप्रमुख व त्यांचे युवराज त्यांचेवर दबाव आणण्यासाठी कोपरगावातील चौकात येऊन त्यांचेवर दबाव निर्माण केल्याची घटना फार जुनी नाही.त्यामुळे मोठे साहेब 1995 सालच्या निवडणुकीत आपला पराभव होईल या भीतीने व सेनेचे उमेदवार रावसाहेब सोनवणे यांनी दाखवलेल्या करामतीने, पराभवाच्या भीतीने प्रचंड अस्वस्थ होऊन चौकातील एका पान टपरीवर येउन शिवसैनिकांना त्यांच्या रिक्षा आपल्या गडावर येऊ न देण्याचा व बंद करण्याचा दम देऊन गेल्याची घटना ताजी झाली आहे.त्यावेळी सेनेच्या अनेकांनी आपल्या चौकाचौकातील फलकावर ,साहेब आले अन,पान खाऊन गेले”अशा आशयाच्या बातम्या दिल्या होत्या.आता सेना त्यांच्या मांडीवर जाऊन बसली हा भाग अलाहिदा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close