जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात 269 केंद्रावर होणार कडक पोलीस संरक्षणात होणार मतदान

जाहिरात-9423439946

संपादक नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा नुकत्याच थंडावल्या असून आता निवडणूक आयोगाला मतदानाचे वेध लागले आहे.त्यासाठी त्यांनी तयारी पूर्ण केली असून 269 मतदार केंद्रावरील 1 लाख 34 हजार 956 पुरुष,तर 1 लाख 29 हजार 496 स्रिया,6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 64 हजार 388 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.त्यासाठी तेवढेच मतदान यंत्रे व व्ही. व्ही.पॅट यंत्रे जोडण्यात येणार आहेत.मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 1 हजार 500 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून एक हजार 200 पोलीस तैनात करण्यात आले आहे.तर तेवढेच केंद्राध्यक्ष नेमण्यात आले असून 54 राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.68 व्ही.व्ही.पॅट मशीनची अतिरिक्त तैनाती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली आहे.

कोपरगावातील 269 मतदार केंद्रावरील 1 लाख 34 हजार 956 पुरुष,तर 1 लाख 29 हजार 496 स्रिया,6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 64 हजार 388 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.त्यासाठी तेवढेच मतदान यंत्रे व व्ही. व्ही.पॅट यंत्रे जोडण्यात येणार आहेत.मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 1 हजार 500 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून एक हजार 200 पोलीस तैनात करण्यात आले आहे.तर तेवढेच केंद्राध्यक्ष नेमण्यात आले असून 54 राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावरील साहित्य आणि सामुग्री याची जुळवाजुळव पुर्ण झाली असुन प्रशासनाने जय्यद तयारी केली आहे.मतदान केंद्रावर मतदानाला जातांना ईपिक कार्ड नेणे आवश्यक आहे ते हरवले असल्यास पासपोर्ट,वाहन चालविण्याचा परवाना,शासकीय कर्मचारी ओळखपत्र,बँक किंवा पोस्टाचे फोटोसह पासबुक,पँन कार्ड,राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड,नरेगा जाँबकार्ड,श्रम मंत्रालयाद्वारे वितरीत वैद्यकिय विमा स्मार्ट कार्ड,फोटो सह पेन्शनचे कागदपत्रे,आमदार-खासदार यांना दिलेली सरकारी ओळखपत्र,आधारकार्ड या पैकी एक पुरावा सोबत ठेवावा लागणार आहे.सोमवार दि.२१ आँक्टोबर रोजी सकाळी ७:०० वाजता ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत २१९ कोपरगांव विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे,निवडणुक नायब तहसिलदार प्रशांत गोसावी निवडणूक शाखा कोपरगांव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close