कोपरगाव तालुका
आमदार कोल्हेनींच सूडबुद्धीने आपला आसवणी प्रकल्प बंद केला-त्या कारवाई नंतर काळेंचा पहिल्यांदाच आरोप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना शेतकऱ्यांच्या जमिनीला जास्त भाव मिळावे म्हणून आपण राज्यसरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा लढा उभा केला असता विद्यमान सत्ताधारी लोकप्रतिनिधीने दिड वर्षांपूर्वी राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्याविरुद्ध भडकावून देऊन सूडबुद्धीने आपल्या सहकारी कारखान्याचा आसवनी प्रकल्पाची चौकशी लावून आपला प्रकल्प बंद ठेवला असल्याचा आरोप कर्मवीर काळे काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आ. कोल्हे यांचे नाव न घेता या घटनेनंतर पहिल्यांदाच केला आहे.
सरकारने शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी ६६ नियम व अटी पूर्ण करता करता शेतकऱ्यांना नाकीनऊ आले त्यामुळे असंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे ७० वर्षात जे घडले नाही ते कोपरगाव विधानसभा मतदार संघात घडले. शेतकऱ्यांनी सरसगट कर्जमाफी साठी ऐतिहासिक संप पुकारला मात्र हा संप मोडण्याचे अलौकिक (?) काम तालुक्याच्या आमदारांनी केले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले – काळे
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोळपेवाडी बाजारतळ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,कचरू कोळपे, कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक वसंतराव आभाळे, माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे, बाबासाहेब कोळपे, सुरेगावचे उपसरपंच सुनील कोळपे, सदस्य डॉ. आय. के. सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव वैराळ होते.
समृद्धी महामार्गात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बागायती जमीनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात होत्या. त्यावेळी कोपरगाव तालुक्याच्या आमदारांनी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यावेळी आपण या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो. पण हे तालुक्याच्या आमदारांना सहन झाले नाही. त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सरकारला माझ्या विरोधात भडकविले. राज्य शासनाला खोटी माहिती देवून आसवनी प्रकल्प बंद पाडला.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,समृद्धी महामार्गात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बागायती जमीनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात होत्या. त्यावेळी कोपरगाव तालुक्याच्या आमदारांनी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यावेळी आपण या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो. पण हे तालुक्याच्या आमदारांना सहन झाले नाही. त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सरकारला माझ्या विरोधात भडकविले. राज्य शासनाला खोटी माहिती देवून आसवनी प्रकल्प बंद पाडला. त्यावेळी हजारो कामगार रोजगारापासून वंचित राहिले. शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सातत्याने शासनदरबारी भांडत होतो. त्यावेळी तालुक्याच्या आमदारांनी आपल्या पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करून तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची आसवनी प्रकल्प चौकशीच्या नावाखाली बंद पाडून कष्टकरी जनतेच्या अन्नात माती कालविण्याचे पाप केले.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,कोपरगाव तालुका विचारधारा जपणारा तालुका आहे. राजकारण ठराविक पातळीपर्यंत करायचं असत ही या कोपरगाव तालुक्याची परंपरा आहे. मात्र शेतकरी संप मोडून काढल्याप्रमाणे राजकारणाच्या आदर्श परंपरेला आमदारांनी मोडून काढीत काढले तरी सुद्धा न डगमगता आपण सातच दिवसात पुन्हा आसवणी सुरु करून दाखवून कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांच्या विचारांवर आपली वाटचाल सुरु आहे. आपल्याला कितीही त्रास झाला तरी ते सहन करण्याची क्षमता मला आपण दिलेल्या पाठबळामुळे आजवर मिळत आली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभा निवडणुक लढवीत आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी ६६ नियम व अटी पूर्ण करता करता शेतकऱ्यांना नाकीनऊ आले त्यामुळे असंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यामुळे ७० वर्षात जे घडले नाही ते कोपरगाव विधानसभा मतदार संघात घडले. शेतकऱ्यांनी सरसगट कर्जमाफी साठी ऐतिहासिक संप पुकारला मात्र हा संप मोडण्याचे अलौकिक (?) काम तालुक्याच्या आमदारांनी केले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. अशा शेतकऱ्यांचा संप मोडणाऱ्या व कष्टकऱ्यांच्या अन्नात माती कालविणाऱ्या तालुक्याच्या आमदारांना तुम्ही माफ करणार का ? असा प्रश्न आशुतोष काळे यांनी विचारला असता हजारो नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले.
या वेळी भाजपलासोडचिट्ठी देत अनेक कार्यकर्त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सभेत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश संपन्न झाला. सभेचे प्रास्ताविक डॉ.प्रकाश कोळपे यांनी केले. सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार गोरक्षनाथ कोळपे यांनी मानले.