जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास..या चित्रपटातुन सर्वांपर्यत पोहचेल-विश्वास

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने १९ फेब्रुवारी रोजी साजरी झाली.शहरात या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले या पार्श्वभूमीवर भूमीवर शहरातील सुदेश टाँकीज येथे ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व कलविंदर दडियाल आदींनी “पावनखिंड” या चित्रपटाच्या शोचे आयोजन सर्वसामान्य नागरिक व तरूणांसाठी केले होते.

“पावनखिंडीचा रणसंग्राम घडून ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा आजही जनमानसावर प्रभुत्व गाजवत असून बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा चित्रपट आहे”-कलविंदर दडियाल,अध्यक्ष,कोपरगाव शहर शिवसेना.

सदर प्रसंगी राजेंद्र झावरे म्हणाले की,”पावनखिंड” या चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास सर्वसामान्य पर्यत पोहचला गेला आहे.मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या तरूणांना कळावे हि आमची इच्छा आहे.आजच्या तरूणांना इतिहास माहिती होणे गरजेचे आहे.”पावनखिंड”हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट असुन यामुळे सर्वसामान्य नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजेल त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

या वेळी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,कोपरगाव शहर प्रमुख कलविंदर दडियाल,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,दिलीप आरगडे,दिलीप सोनवणे,इरफान शेख,बाळासाहेब सांळुके,राहुल देशपांडे,अश्यपभाई पटेल,अक्षिता आमले,अश्विनी होणे,सुनिल,कुढांरे,वैभव गिते,अशोक पवार,मंगेश देशमुख,प्रवीण शेलार,उमेश छुगाणी,सतिष खर्डे,निलेश शिंदे,रवींद्र पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close