जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील उपनगर असलेल्या संजयनगर येथील रहिवाशी असलेल्या व बालवाडीत शिक्षण घेत असलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ऐन गांधी जयंतीच्याच दिवशी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आपल्या घरानजीक राहणारा आरोपी तरुण निहाल अजीज शेख याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टाटा मॅजिक गाडीत आपल्या मैत्रिणी सोबत खेळत असलेल्या आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद आपदग्रस्त मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सदरच्या आरोपी निहाल शेख यास रात्रीच अटक केली असून आपदग्रस्त मुलीस वैद्यकीय तपासणीस नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या संजयनगर येथे एक अल्पसंख्याक कुटुंब रहात असून घरात या मुलीस आजोबा,आजी,आई वडील व एक भाऊ व दोन बहिणी असे सदस्य राहत आहे.सदर आपदग्रस्त मुलगी हि शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या बालवाडीत शिक्षणासाठी सकाळी आठ वाजता आपल्या घरातील नातेवाईकांसोबत जाते.व अकरा वाजेच्या सुमारास परत येते.दोन ऑक्टोबरला ती नेहमी प्रमाणे शाळेत जाऊन आली व सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ती आमच्या घरामागील उभ्या असलेल्या टाटा मॅजिक या प्रवासी वाहनात बसून आपल्या अन्य मैत्रिणींसोबत खेळत असताना त्याच गाडीत शेजारचा आरोपी निहाल अजीज शेख रा.मारुती मंदिराजवळ संजयनगर याने तिच्याशी गोडगोड बोलून त्याच्या अंगावर बसून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले असल्याची बाब दुसऱ्या दिवशी तिच्या आजीच्या लक्षात आली. कारण ती वारंवार आपल्या स्वच्छता गृहात जाऊन गुप्त अंगाची स्वच्छता करीत होती मुलीच्या वागण्यातील बदल आजीच्या लक्षात आल्याने त्यानी तिला विश्वासात घेतले व झाला प्रकार तिच्याकडून वदवून घेतला.व नंतर तिच्या सोबत खेळत असलेल्या मैत्रिणी सोबत या बाबत चर्चा करून खातरजमा करून घेतली .व नंतर सदर मुलीचे आई व वडील सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनात आणून दिला.त्यांनतर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.376/2019,भा.द.वि.कलम 376,व बाल लैंगिक अपराधां पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4 प्रमाणे दखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे हे करत आहे.त्यांनी सदरच्या आरोपीस रात्रीच अटक केली असून आपदग्रस्त मुलीस वैद्यकीय तपासणीस नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close