जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राजेश परजणे यांचे अपक्ष नामनिर्देशन दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

राज्य विधानसभेच्या २१ ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आपले अपक्ष नामनिर्देशन पत्र आज दुपारी १२.०२ वाजता निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केल्याने कोपरगावात आता वंचित आघाडीसह पंचरंगी निवडणूक होईल असा आमच्या प्रतिनिधीने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे.

दरम्यान काल नामनिर्देशन भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजेश परजणेंसह वारी येथील अपक्ष उमेदवार माजी सरपंच रावसाहेब चांगदेव टेके ,शिवाजी कवडे,(बळीराजा पक्ष),शहा अलिम छोटू(अपक्ष),कोल्हे शीतल दिगंबर (अपक्ष),दिलीप मारुतीराव तिडके (अपक्ष),आदी सहा लोकांचे आठ अर्ज दुपारी पाऊण वाजे पर्यंत दाखल झाले होते.

महाराष्ट्रासह हरियाणा राज्याची विधानसभा निवडणूक एकाच वेळी २१ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.या निवडणुकीत कोपरगावात सत्ताधारी भाजपने आपली उमेदवारी आ. स्नेहलता कोल्हे याना जाहीर केल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.व त्यांनी नुकताच आपला अर्ज दाखल केला आहे.

प्रारंभी त्यांनी आपल्या समर्थकांचा व्यापारी धर्मशाळेसमोर समर्थकांना एकत्र करीत त्यांचा नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर एक सभा घेतली सदर सभेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला.आपण कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही असा अप्रत्यक्ष आपले मेहुणे व राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाचा उच्चार न करता इशारा दिला आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.सदर प्रसंगी राजेंद्र जाधव, व यांनी मार्गदर्शन केले.त्या नंतर सर्व समर्थकांसह त्यानी निवडणूक कार्यालयाकडे कूच केले.त्यावेळी त्यांच्या समर्थकानी हातात त्यांची छबी हातात धरून त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

व त्या नंतर आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यानी संविधनाप्रती एकनिष्ठतेची शपथ घेऊन आपले नामनिर्देशन पत्र स्वीकारले.त्यावेळी राजेंद्र जाधव,पुणतांब्याचे सरपंच धनंजय धनवटे,संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close