जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात साई निवारा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवास प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या निवारा परिसरात सांस्कृतीक कार्यक्रमात अग्रणी असलेल्या साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी माता मंदिर परिसरात मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन केले असून त्यास भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले आहे. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.

राज्यातील गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. मधला पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो, समजतच नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते
देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले आहे. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा करण्याची भारतात प्राचीन परंपरा आहे.या दिवशी देवीच्या देवळात घटस्थापना करतात.या काळात नवमी पर्यंत देवीसमोर सप्तशतीचा पाठ करतात.मंदिरात व घरात अहोरात्र दिवे लावून देवीपुढे विविध फुलांच्या माळा बांधल्या जातात.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा करण्याची भारतात प्राचीन परंपरा आहे.या दिवशी देवीच्या देवळात घटस्थापना करतात.या काळात नवमी पर्यंत देवीसमोर सप्तशतीचा पाठ करतात.मंदिरात व घरात अहोरात्र दिवे लावून देवीपुढे विविध फुलांच्या माळा बांधल्या जातात.निवारा परिसरात चार वर्षांपूर्वी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या पुढाकाराने व नजीकच्या भाविक भक्तांच्या सहकार्याने सप्तशृंगी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी रांगोळी स्पर्धा,नृत्य स्पर्धा,अरुण पगारे यांची भजन संध्या,आयोजित केल्या आहेत.दररोज सकाळ सायंकाळी विविध मान्यवारांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरत्यांचे आयोजन केले आहे. निवारा व परिसरातील महिला,तरुणी या उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमानंतर साग्रसंगीत फेर धरून नाचत आपला आनंद व्यक्त करत आहे.विजयादशमीच्या दिवशी देवीचे विधिवत विसर्जन करण्यात येते.तर रविवार दि.तेरा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी त्या प्रभागाचे नगरसेवक जनार्धन कदम,राजेंद्र कोठारी,प्रताप जोशी यांच्यासह अध्यक्षा नंदिनी कदम व त्यांच्या महिला सहकारी परिश्रम घेत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close