जाहिरात-9423439946
अर्थकारण

…आता मंदिरांतील लोखंडी दानपेटी हद्दपार,आता सुरु ‘डिजिटल दानपेटीचे युग’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सर्व देवस्थानांच्या परिसरात आपल्याला विशिष्ट धातूची दानपेटी पाहाणे हि सामान्य घटना मानली जाते मात्र आता त्या जागी आगामी काळात मंदिराच्या जागी तिथे,’डिजिटल दानपेटी’ दिसली,तर आश्चर्य वाटायला नको; कारण अशा प्रकारची राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी नगर जिल्ह्यातील कोपरगावात बसविण्यात आली असल्याची बातमी हाती आली आहे.

‘‘डिजिटल दानपेटी देऊन समता नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल क्रांतीत बाजी मारली आहे.या दानपेटीमुळे मंदिरातील दानपेटी चोरीस जाण्याचे प्रकार आता यापुढे घडणार नाहीत; तसेच पूर्वी वापरात असलेली दानपेटी उघडल्यानंतर सुट्टे पैसे मोजण्यासाठीचा होणारा त्रासदेखील होणार नाही.शिवाय भाविकांनी केलेले सर्व दान महादेव मंदिर कमिटीच्या नावाने समता पतसंस्थेत असलेल्या बचत खात्यात रोज जमा होईलव त्यावर सात टक्के व्याजदर देण्यात येणार आहे”-जनार्दन कदम,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

त्यासाठी तंत्रज्ञानात नेहमीच अग्रेंसर असलेल्या कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.तेथील निवारा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात या डिजिटल दानपेटीचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.महादेव मंदिर कमिटीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,निवारा भजनी मंडळाचे प्रमुख बाबासाहेब कापे,माऊली गायकवाड,वाकचौरे महाराज यांनी ही डिजिटल दानपेटी स्वीकारली आहे.

समता पतसंस्थेचे सहायक सरव्यवस्थापक संतोष मुदबखे यांनी या डिजिटल दानपेटी बाबत माहिती दिली असून त्या ते म्हणाले की,’‘समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात समता नागरी सहकारी पतसंस्था अग्रेसर असून,समताने आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक पातळीवर देखील कीर्ती मिळविली आहे.जागतिक पातळीवरील डिजिटल दानपेटीचा हा पहिलाच प्रयोग आहे.या दानपेटीच्या अनुषंगाने सर्व भाविकांचे डिजिटल दानही सुरक्षित होईल.’

सदर प्रसंगी निवारा भजनी मंडळाचे हौशीराम बर्गे,दिलीप संगमनेरे,प्रवीण कोल्हे,विजय कांगुने,जोशी गुरू,तसेच निवारा महिला भजनी मंडळाच्या महिला,निवारा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close