जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सहकार चळवळीत सभासदांचे हित महत्वाचे- आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

सहकारी संस्थांचे हित म्हणजे सामान्य माणसाचे हीत हा विचार सहकार चळवळीत जोपासला तरच सहकारी चळवळीला उज्वल भवितव्य आहे असे प्रतिपादन  प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
    कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि.ची ४८ वी तर गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर काळे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळीमार्गदर्शन करताना ते बोलत होते.
   सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास आहेर, बाळासाहेब बारहातेसुधाकर रोहोमअशोक तीरसे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अशोक मुरलीधर काळे, कारखान्याचे सचिव सुनील कोल्हेकार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यदगोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिचे कार्यकारी संचालक सुभाष आभाळेगौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर हाळनोरसर्व संचालक मंडळासह सभासद व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

माजीं खा. शंकरराव काळे यांनी सुरु केलेल्या आपल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहे.आपण संस्था काटकसरीने व अतिशय जबाबदारीने चालवीत असल्यामुळे आपण कर्मवीर काळे यांचे स्वप्न पूर्ण करून संस्थेची अद्ययावत इमारत उभी केली. संस्थेने ऊस वाहतूक ट्रकधारक, ऊस तोडणी मजूर व कंत्राटदारांचे सर्व प्रकारचे देणी वेळेवर दिले असल्याचे सांगितले. आगामी गळीत हंगाम खूपच अडचणीचा असून जवळपास पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरून आणावा लागणार आहे. त्या दृष्टीने ट्रकधारक सभासदांनी तयारी करून चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून कंपनीस व शेतकी खात्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.

 सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष आभाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्यवस्थापक  सोपानराव डांगे यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले.

     याप्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्व. कर्मवीर काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close