कोपरगाव तालुका
कनकुरी रस्त्याची दुरावस्था दूर करा-पवार यांची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी (प्रतिनिधी)
शिर्डी लगत असलेल्या दोन हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या कनकुरी या गावाला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांची दुरवस्था झालेली या रस्त्याची दुरावस्था कधी दूर करणार असा सवाल शिवसेनेचे कार्यकर्ते विठ्ठल पवार यांनी विचारला असुन या प्रश्नात खा. सुजय विखे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे
कनकुरी हे गाव बागायती राहता तालुक्यातील राजकारणात दबदबा असलेले गाव असून साईबाबा संस्थानला सर्वाधिक कामगार देणारे गाव असा त्याचा लौकिक आहे. शिर्डी लगत ३ किमीवर असलेल्या या गावांच्या रस्त्याची मात्र खूपच दुरावस्था झाली आहे. एक कि.मी.वर जे माध्यमिक शाळा असून त्याकडे जाणारा रस्ता खराब झालेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना जाताना व प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो काही रस्त्यावर अनेक दिवसांपासून खडी पडुन आहे पण काम कधी सुरू होणार असा सवाल शिवसेनेचे कार्यकर्ते पवार यांनी विचारला असुन या प्रश्नात खा सुजय विखे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे
कनकुरी निमशेवडी हा रस्ता मागिल पावसाळ्यात वाहून गेला होता काही रस्ता अतिक्रमणाना मुळे मोठा अरुंद व खराब झाला आहे गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या धमन्याच खराब झाल्याने नागरिकांन मध्ये नाराजीची भावना आहे या रोडचे टेंडर निघाले असले तरी काम का ठेकेदार सुरू करीत नाही असा सवाल पवार यांनी विचारला आहे या कामात शासकीय अधिकारी का दुर्लक्ष करतात हा खरा प्रश्न असुन जर हे काम झाले नाही तर शासकीय अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा विठ्ठल पवार यांनी दिला आहे