नगर जिल्हा
शिर्डी साईनाथ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी (प्रतिनिधी)
शिर्डी येथिल श्रीसाईनाथ माध्यमिक विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिन निमित्ताने शाळेचे प्राचार्य मुठाळ यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,यावेळी शिक्षक,विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी बोलतांना शाळेचे प्राचार्य मुठाळसर म्हणाले की शिक्षक जर वाट चुकला तर संपुर्ण पिढी वाट चुकेल त्या मुळे शिक्षकांवर भावी पिढीची मोठी जबाबदारी असते,शिक्षकाने दिलेले ज्ञान आत्मसात करणे हाच खरा शिक्षक दिनाचा अर्थ आहे, असे ते शेवटी म्हणाले, यावेळी अनेक विद्यार्थीनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विचार मांडले,शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका घेऊन शिक्षकांवर असलेली जबाबदारी अनुभवली, शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मुलांच्या तुलनेत मुलींनीच जास्त शिक्षकांची भुमिका केली, या कार्यक्रमा प्रसंगी माजी मुख्यध्यापक, शिक्षक यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थांना चहा, खाऊचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ.बोऱ्हाडे ,पर्यवेक्षक कुलकर्णी व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ आगलावे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तर सादर कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया व सर्व पदाधिकारी तसेच शाळा समितीचे अध्यक्ष मनोज लोढा यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जाधवसर, वाबळेसर,गौर्डेसर, म्हस्केसर, वारुळेसर,पंडितसर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले,यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.