जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात चोवीस तास पाणी वापरणारे ग्राहक उघड,नागरिकांत संताप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात पाणी टंचाई असताना चोवीस तास पाणी वापरून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अपप्रवृत्तीची नावे आज कोपरगाव नगरपरिषदेवर अध्यक्ष विजय वहाडणे यांनी उघड केली आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

“नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते.थोडीफार नैतिकता असेल तर बेसुमार पाणी वापरणाऱ्यानी किमान दहा पट तरी पाणीपट्टी भरली पाहिजे.जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणी पुरवठा एक ते दिड तासांवर आणण्याचे काम सुरू झालेले आहे.हे काम दोन महिन्यात पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे”-विजय वाहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेत भाजप कोल्हे गटाने विकास कामांना विरोध केल्याने शहरात उघड-उघड दोन तट पडले असून एकतीस रस्त्यांची निविदा रखडल्या आहेत.त्यामुळे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे गटाचे नगरसेवक व त्यांचे प्रताप उघड करण्याचा सपाटा लावला आहे.गत वेळी संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी थेट नावे घेऊन बोलावे मोघम बोलू नये असे आव्हान वहाडणे यांना दिले होते.त्या नुसार कोण-कोणत्या नगरसेवकांनी रस्त्यांचे ठेके घेतले आहे.आहेत व बिलांसाठी चकरा मारत आहेत त्याची जंत्रीच जाहीर केली आता त्यांमुले शहरात खळबळ उडाली होती.आता त्यांनी कोणत्या कोणत्या नगरसेवक व महत्वपूर्ण नेत्यांनी चोवीस तास,बारा तास,आठ तास पाणी वापरून सामान्य जनतेवर अन्याय करत आहेत त्याचा भंडाफोड केला आहे.

त्यांनी जाहीर केलेल्या यादी नुसार मुख्य जलवाहिणीवर चोवीस तास पाणी पुरवठा असणारे सतरा ग्राहक पुढील प्रमाणे आहेत.समता पतसंस्था,विजयकुमार प्रेमराज काले,राजेंद्र झावरे (फक्त राजेंद्रजी झावरे हेच एकमेव असे आहेत कि ज्यांनी दि.१७ एप्रिल २०१२ रोजी स्वतःचे मुख्य जलवाहिनीवरील नळजोड काढून टाका असे पत्र दिलेले आहे),तर या यादीत एस.टी.डेपो,तालुका विकास मंडळ,बाळकृष्ण सारंगधर, विठ्ठल क्षत्रिय,बद्रीनाथ चावला, राजेंद्र बा.वाणी,माजी सैनिक कार्यालय,संजय बोऱ्हाडे,अरुण वाणी,कल्याण गंगवाल,के.बी.पी.विद्यालय,शिलेदार साहेबराव,कोपरगाव वि.सो.पेट्रोल पंप,बोरावके मोटेल्स,कमलिनी सातभाई वाचनालय,दिलीपराव वाघ,गुलाब अगरवाल,वायखिंडे,माधव जोशी,रविंद्र पाटील,द्वारकानाथ व्यास,विठ्ठल आदमाणे,सेवा निकेतन,होली फॅमिली चर्च,अंबादास साळुंके,वर्धमान पांडे आदींचा समावेश आहे.
बारा तासापेक्षा जास्त पाणी वापरणारे ४८ असून त्यात बाबासाहेब गाडे,शिवाजी आनंदराव संधान,राहुल रोहमारे (संधान),केशव भवर,जानकीदेवी पडियार,केशवराव साबळे,नानासाहेब चांदगुडेआदींचा समावेश आहे.
तर आठ तास पाणी वापरणारे संजय सातभाईंसारखे अनेकजण आहेत.नगरपरिषदेतील सत्तेचा गैरवापर करून प्रचंड पाणी वापरणारेच विचारतात कि पाणी का कमी पडते.थोडीफार नैतिकता असेल तर बेसुमार पाणी वापरणाऱ्यानी किमान दहा पट तरी पाणीपट्टी भरली पाहिजे.जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणी पुरवठा एक ते दिड तासांवर आणण्याचे काम सुरू झालेले आहे.हे काम दोन महिन्यात पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.शहरवासीयांना पाणी कुणामुळे कमी पडते हे यावरून समजू शकते.कर्मचाऱ्यांना हाताशी धरून,अधिकाऱ्यांवर दबाव आणून वर्षानुवर्षे मनमानी करणारे अजूनही भानावर नाहीत.त्यांना भानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शहर विकास व्हावा यासाठी नेत्यांनी अशा प्रवृत्तीना पाठिशी घालू नये.बस स्थानकासमोर चंदुलाल दिपचंद काले यांच्या मोठ्या व्यापारी संकुलाच्या तळमजल्याच्या जागेत व्यावसायिक गाळे बांधून विकले व प्रचंड पैसा कमविला असल्याचा आरोप केला आहे.गाळेधारक व ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने रहदारीला कायमस्वरूपी अडथळा निर्माण झाला आहे.ते काढण्याबाबत त्यांना नगरपरिषदेने नोटिसही दिलेली आहे. निलेश भालेराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे घेतलेल्या दुकान गाळ्याचे भाडे तर थकवलेच पण आजपर्यंत अनामत रक्कमही भरलेली नाही,एकूण बाकी सव्वा दोन लाख रू.आहे.या गाळ्याचे खरे मालक कोण आहेत हे आदरणीय कैलास जाधवच सांगू शकतील असा शालजोडा लगावला आहे.दुसऱ्याचे नावावर गाळा घेऊन, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून फुकट गाळा वापरण्याचा धंदा बिनबोभाट सुरू आहे.त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न बुडून शहर विकासाला पैसा कमी पडतो.वादग्रस्त सर्व्हिस स्टेशन प्रकरण फेटाळून न्यायालयाने जाधव यांना पाच हजार रू.कोर्ट खर्च भरण्याचा आदेश पूर्वीच दिलेला आहे.उच्च न्यायालयाने ही यांचा दावा फेटाळला आहे.जाधव यांनी सर्व्हिस स्टेशन खरेदीची कागदपत्रे दाखविली तर बरे होईल.यानंतर हातगाड्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून हप्ते उकळणाऱ्याची नावेही लवकरच उघड होणार असल्याचा इशारा दिला आहे.प्रचंड थकबाकी असलेले गाळेधारकांना नोटिसा दिल्या आहेत.वसुली व गाळे सील करण्याची कारवाईही सुरू झालेली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close