कोपरगाव तालुका
जनसुविधा योजनेतून कोपरगावला ५० लाख रुपये निधी मंजूर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांना निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करीत असून या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्याला जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्या सोनाली राहुल रोहमारे यांनी दिली आहे.
मागील चार वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागले असून वैयक्तिक लाभाच्या सर्वच शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांना मिळाला आहे.विकासाची दूरदृष्टी असलेल्या आ.शुतोष काळे यांची प्रेरणा घेऊन सर्व जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत कार्यालय,स्मशानभूमी,पाणीपुरवठा योंजना तसेच शाळा खोल्यांना मोठ्या प्रमाणात निधी यापूर्वी प्राप्त झाला आहे.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.यामध्ये गोधेगाव,भोजडे व वेळापूर या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ईमारत तसेच देर्डे कोऱ्हाळे व संवत्सर या गावातील स्मशानभूमीसाठी हा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जि.प. सदस्या सोनाली रोहमारे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्याला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्री घुले यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.