कोपरगाव तालुका
जिनिंग प्रेसिंग सोसायटीने पूरक व्यवसाय सुरु करावे-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्थापन केलेल्या सर्वच सहकारी संस्था आज प्रगतीपथावर आहे.त्यांनी स्थापन केलेल्या कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीने देखील आपल्या प्रगतीचा आलेख देखील नेहमीच उंचावत ठेवला हि अभिमानास्पद बाब असून संस्थेने प्रगतीची घौडदौड अशीच पुढे सुरु ठेवून पूरक व्यवसाय सुरु करावे असे आवाहन माजी आ.अशोक काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कापसाची अनिच्छितता ओळखुन माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी सन २०११-१२ पासून कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या डीस्टीलरी विभागाकरिता १०० टक्के बॉक्सेस (खोकी) उत्पादनाचे काम संस्थेकडे सोपविल्याने संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे”-गोरक्षनाथ जामदार,अध्यक्ष,कोपरगाव सहकारी जिनिंग सोसायटी.
कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०१९-२० आर्थिक वर्षाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री रोहोम,सभासद व विविध संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी व अधिकारी यांचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आ.अशोक काळे म्हणाले की,”दिवसेंदिवस पावसाअभावी कापूस उत्पादन कमी होत आहे.त्यामुळे जिंनिग व प्रेसिंग करीता पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध होत नाही.त्यामुळे संस्थेने कापूस खरेदी करून विक्री करावा.भविष्यात संचालक मंडळाने संस्थेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने बॉक्सेस,प्लेट व पार्टीशन व्यवसायासह आणखी पूरक व्यवसाय करावे.तसेच संस्थेची कर्ज उभारण्याची मर्यादा वाढविण्यासाठी संचालक मंडळाने तसेच सभासदांनी संस्थेचे भाग भांडवलात वाढ करावी असे आवाहन केले.
प्रास्ताविक करतांना संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार म्हणाले की,”कापसाची अनिच्छितता ओळखुन माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी सन २०११-१२ पासून कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या डीस्टीलरी विभागाकरिता १०० टक्के बॉक्सेस (खोकी) उत्पादनाचे काम संस्थेकडे सोपविल्याने संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.माजी आ.काळे व कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विद्यमान आ.काळे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज प्रगती पथावर असल्याचे सांगितले.अहवाल वाचन संस्थेचे महाव्यस्थापक काशीद एस.एन.यांनी केले.सभेस उपस्थित असलेल्या सभासदांनी संचालक मंडळास संस्थेमध्ये नवीन व्यवसाय,उद्योग धंदा करण्यात यावा व संस्थेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे सांगण्यात आले.
सदर सभेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सभासद व विविध संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी व अधिकारी यांचे संचालक सचिन आव्हाड यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जी.बी.शेख यांनी केले.