कोपरगाव तालुका
कोपरगावात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एक वृद्ध जखमी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर एका गाईने मुरलीधर कुलकर्णी (वय-75) रा. कोपरगाव बेट या वृद्धावर अचानक हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले असून नजीकच्या नागरिकांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी भरती केले आहे.या घटनेने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून उपद्रवी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान या ठिकाणी योगायोगाने शहरातील कार्यकर्ते सुशांत घोडके यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या आपदग्रस्त इसमास सोडविण्यासाठी धाडस केले व सदर जनावरांना पिटाळण्यास प्रारंभ केला त्यांचे हे धाडस पाहून काही नागरिकही काठ्या घेऊन धावत आले व त्यांनी सदर वृद्धांची सुटका केली त्यामुळे घोडके व मदत करणाऱ्या नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव नगरपालिकेने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेच्या ढिसाळ कारभारविरुद्ध आंदोलन करील-राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांचा इशारा
कोपरगावात सध्या मोकाट जनावरे व कुत्रे,डुकरे यांची मोठी संख्या वाढली आहे.नुसती वाढली नसून ती हाताबाहेर गेली आहे.रस्त्यारस्त्याववर जनावरांचे कळप उभे किंवा बसलेले दिसतात.त्यामुळे राहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा येतो.अचानक त्याच्या हालचालीने बऱ्याच वेळा अपघातही होत आहे. व त्यात अनेक जायबंदी होत आहेत.तर काहींचे हकनाक बळी जात आहेत.यातून वाहनांचे वित्तीय नुकसान होते ती बाब अलहिदाच आहे.या बाबत नगरपालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.