जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विजेचा बट्ट्याबोळ,शेतकऱ्यांचा कोपरगावात अधिकाऱ्यांना घेराव

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात रब्बी पिके ऐन अखेरच्या टप्यात असताना महावितरण कंपनीने पूर्ण दाबाने ब नियमित वीज पुरवठा करण्यास असमर्थता आढळल्याने आज जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द आदी भागातील शेतकऱ्यांनी आज साडे दहा वाजे पासून साडे अकरा पर्यंत अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने व एक तासाने नियमित पुरवठ्याचे आश्वासन दिल्याने अखेर घेराव मागे घेण्यात आला आहे.

महावितरण कम्पनीने विजबिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्र आठ दिवस बंद ठेवले होते.वसुली काही अंशी झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना महावितरण कंपनीच्या कोपरगाव उपविभागाने अद्याप पुरवठा सुरळीत केला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते.

महावितरण कम्पनीने विजबिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्र आठ दिवस बंद ठेवले होते.वसुली काही अंशी झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना महावितरण कंपनीच्या कोपरगाव उपविभागाने अद्याप पुरवठा सुरळीत केला नाही त्यामुळे काढणीला आलेली गहू,हरभरा,मका,आदी रब्बी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला अनेकांचे तसे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या जेऊर कुंभारी व डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आज सकाळी साडे दहा वाजता कोपरगाव पॉवर हाऊस येथील कार्यालयाला घेराव घातला त्यामुळे अधिकाऱ्यांची बोबडी वळाली होती पोलिसांना धावाधाव करावी लागली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते,संजीवनी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते,मधुकर वक्ते,राजेंद्र गिरमे,डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ,मच्छीन्द्र पुंगळ,जेऊर कुंभारीचे माजी सरपंच रमेश वक्ते,विठ्ठलराव आव्हाड,जालिंदर चव्हाण,बाजीराव वक्ते,अंकुश पुंगळ, बाजीराव पुंगळ, आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

यावेळी माजी सभापती शिवाजी वक्ते,माजी संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सरपंच रमेश वक्ते,सरपंच संजय गुरसळ,मच्छीन्द्र पुंगळ आदींनी महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेलकी विशेषणे लावून चांगलेच फैलावर घेतले असून त्यांची बोलती बंद केली असल्याचे दिसून आले आहे.

त्यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे,सहाय्यक अभियंता यज्ञेश शेलार आदी अधिकारी शेतकऱ्यांच्या या रोषाला सामोरे गेले आहे.

अधिकाऱ्यांनी या पुढे पूर्ण दाबाने दिवसा आठ तास व रात्री पूर्ण वेळ नियमित वीजपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्यावर हा घेराव मागे घेतला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नितीक्षक दीपक बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close