गुन्हे विषयक
संजीवनी प्रतिष्ठानचे प्रवेशद्वार उध्वस्त
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दीड की.मी.अंतरावर असलेल्या येवला नाका येथे साधारण साडे चार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मशालीचे मोठे प्रतीक असलेल्या शहराच्या सौन्दर्यात भर घालणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या स्मारकाच्या प्रवेश द्वारावर आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या एका अवजड ट्रक चालकाचे पुढील गाडीला धडकून नियंत्रण सुटल्याने त्याने या प्रतिष्ठानचे प्रवेशद्वार उध्वस्त करण्यासह लिंबाच्या झाडाचे व गाडीचे मोठे नुकसान केले आहे.सुदैवाने यात प्राणहानी झालेली नसल्याची माहिती या ट्रक चालकांच्या अन्य संबंधीताने दिली आहे.
कोपरगाव शहराच्या उत्तरेस येवला नाका येथे कोपरगाव शहरात प्रवेश करताना जुना येवला रस्ता व नगर -मनमाड रस्त्याच्या मध्ये असलेल्या व संजीवनी युवा प्रतिष्ठानने साधारण साडे चार वर्षांपूर्वी काही लाख रुपये खर्चून उभारलेल्या मशालीच्या स्मारकाला जोराची धडक दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,आज पहाटेच्या सुमारास एक राजस्थान येथील एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (क्रं.आर.जे.०६ जी.सी.५७२३) यावरील चालक आपल्या ताब्यातील अवजड ट्रक त्यातील साहित्यासह पुण्याहून दिल्लीकडे जात होता. कोपरगाव शहराच्या उत्तरेस येवला नाका येथे कोपरगाव शहरात प्रवेश करताना जुना येवला रस्ता व नगर -मनमाड रस्त्याच्या मध्ये असलेल्या व संजीवनी युवा प्रतिष्ठानने साधारण साडे चार वर्षांपूर्वी काही लाख रुपये खर्चून उभारलेल्या मशालीच्या स्मारकाला जोराची धडक दिली आहे.ही धडक समोरून अन्य वाहनांच्या तीव्र प्रकाश झोताने समोर उभे असलेले वाहन दिसले नसल्याने झाला असल्याचे मानले जात आहे.या दुर्घटना समोर उभ्या असलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात झाली असून पुढील वाहनचालक अपघातानंतर फरार झाला आहे.तर दुर्घटनाग्रस्त झालेला ट्रक चालकही फरार झाला आहे.सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही.याची कोपरगाव शहर पोलिसांना आमच्या प्रतिनिधीने दूरध्वनी केला तेंव्हा साधी खबरही नव्हती.परिणाम स्वरूप कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.