कोपरगाव तालुका
कोपरगावात गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
आगामी गणेशोत्सवाचे व आगामी सणासुदीचे पार्श्वभूमीवर शहरात व तालुक्यात असामाजिक तत्त्वांनी कुठलाही अनुचित प्रकार करू नये या साठी आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी संयुक्तपणे कोपरगाव शहरात शक्ती प्रदर्शनाची फेरी काढून असामाजिक तत्वांना अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याचे मानले जात आहे.
आगामी काळात हिंदू मुस्लिम बांधवांचे सण उत्सव येत असून त्याच बरोबर विधानसभा निवडणूक संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता राहावी ,कायदा सुव्यवस्था टिकावी या साठी एक विभागीय पोलीस अधिकारी,एक पोलीस निरीक्षक,एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,चार पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दलाचे पन्नास कर्मचारी,पंधरा स्थानिक पोलीस कर्मचारी,पंचवीस गृहरक्षक दलाचे जवान आदीचा लवाजमा या शकीप्रदर्शनात समाविष्ठ होता-सोमनाथ वाकचौरे,विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
येत्या मंगळवारी मुस्लिम बांधवांचा मोहरम ताजिया हा सण असून पुढील दोनच दिवसांनी अनंवत चतुर्दशी येत असून या दिवशी सर्वच गणेश मंडळे आपल्या बुद्धीच्या देवतेचे विसर्जन करणार आहे.त्या पाठोपाठ नवरात्र उत्सव येत असून त्याला लागूनच दसरा हा सण व त्या नंतर दिवाळी येत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनावर अतिरिक्त सुरक्षेचा ताण येणार आहे.या दरम्यान शहर व तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यावर जबाबदारी वाढली असून त्यांनी त्यांच्या अखत्यारीत सर्वच पोलिस ठाण्यांना सतर्क केले आहे. व त्यासाठी सकाळी सडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस ठाणे ते एस.जी. विद्यालय ते संभाजी महाराज चौक ते बस स्थानक व गांधी चौक कोपरगाव बेट या दरम्यान शक्ति प्रदर्शन करून अनुचित प्रकारांना खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे.या पथक समवेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे सोबतच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यासह अतिरिक्त पोलीस दलाची तुकडी असा मोठा लवाजमा उपस्थित होता.