दळणवळण
खाजगी क्षेत्रातुन सार्वजनिक रस्ता करण्यास विरोध,शेतकऱ्यांची तक्रार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी दगडू विठ्ठल गवळी व बाबासाहेब विठ्ठल गवळी यांच्या खाजगी क्षेत्रातून सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांचा रस्ता बेकायदा जाण्यास विरोध असून त्यांनी तशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेरचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असून हे बेकायदेशीर काम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.
“या रस्त्याबाबत ग्रामपंचायतीची भूमिका आडदांड असल्याची त्यांची तक्रार आहे.त्यामुळे आमचा विषय केवळ हा जमिनीच्या मधोमध न घेता एका बाजूने घ्यावा एवढीच आहे.मधोमध घेतल्याने आमचे अपरिमित व भरून न येणारे नुकसान होणार आहे.त्यांनी रीतसर तक्रारीची दखल न घेतल्यास आपण नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील”-बाबासाहेब गवळी,आपदग्रस्त शेतकरी मढी बुद्रुक ता.कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण बावीस कि.मी.अंतरावर मढी बुद्रुक ग्रामपंचायत असून या ठिकाणी सावळीविहिर- भरवस रस्ता ते मढी बुद्रुक रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर असून ते नुकतेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरु झाले आहे.सदरचे काम हे त्याच गावातील गट क्रमांक ३७०(१) मधून बेकायदा सुरु झाले आहे.त्यामुळे सदर क्षेत्र हे दोघां तक्रारदार शेतकऱ्यांचे सामायिक असून शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.सदर काम करण्यासाठी शेतकऱ्याचा विरोध केवळ ते काम जमिनीच्या बांधाच्या कडेने घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाही.त्यामुळे हा बेबनाव सुरु झाला आहे.
त्या आधी त्यांनी याबाबत ग्रामपंचायत मढी बुद्रुक यांचेकडे तक्रार करून पाहिली मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही.अखेर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर व उपविभाग कोपरगाव यांचेकडे धाव घेतली आहे.याशिवाय त्यांनी आपल्या निवेदनाच्या प्रति कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनाही दिल्या आहेत.
याबाबत ग्रामपंचायतीची भूमिका आडदांड असल्याची त्यांची तक्रार आहे.त्यामुळे आमचा विषय केवळ हा जमिनीच्या मधोमध न घेता एका बाजूने घ्यावा एवढीच आहे.मधोमध घेतल्याने आमचे अपरिमित व भरून न येणारे नुकसान होणार आहे.त्यांनी रीतसर तक्रारीची दखल न घेतल्यास आपण नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील असा त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.आता रीतसर तक्रारीची हा विभाग कशी दखल घेतो हा विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.