कोपरगाव तालुका
रामभाऊ शिंदे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी रामभाऊ नाना शिंदे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. परिसरात मामा या नांवाने ते परिचीत होते. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. शिंदे हे धार्मिक वृत्तीचे तर होतेच परंतु आपल्या विनोदी आणि चतुरस्त्र स्वभावाने ते लहान थोरांमध्ये एक आवडीचे व्यक्तिमत्व म्हणूनही चर्चेत असायचे. दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे ते विश्वासू सहकारी होते. गांवातील हरिनाम सप्ताह किंवा इतर धार्मिक कार्यक्रमात ते अग्रभागी असत. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे बाबासाहेब व राजेंद्र ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, कृष्णराव परजणे, उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.