कोपरगाव तालुका
महिला उपासिका शिबीराने धम्माचा प्रसार झपाटयाने होतो . संजय खंडीझोड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
महिला उपासिका शिबीराने धम्माचा प्रसार व महिलांची प्रगती
झपाट्याने होते असे प्रतिपदान भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष
संजय खंडीझोड यांनी खडकी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरंगावचे उपनगर असलेल्या खडकी येथे २५ ऑगष्ट ते ३ सप्टेंबर या दहा दिवसाच्या दरम्यान शिबीर समारोप कार्यक्रमात उपासिकाना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध
महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित भारूड हे होते .
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या कि, खंडीझोड पुढे म्हणाले की , दहा दिवसाच्या उपासिका शिबिरामध्ये वेगवेगळ्या केंद्रीय शिक्षकांनी दहा दिवस प्रशिक्षण देवून त्यांच्या मनातील अज्ञान ,अंधश्रध्दा दूर केल्याने परिवाराचा विकास होतो .त्यातूनच धम्माचा प्रचार व प्रसार कार्य शिबिरातून घडते . केंद्रीय शिक्षिका विशाखा निळे ,जिल्हा सचिव रामदास सोनवणे ,समता सैनिक दलाच्या वत्सलाताई दिवे , जिल्हा संघटक बाळासाहेब खाजेकर , तालुका उपाध्यक्ष सचिन खंडीझोड , भीमराव काकळे उपाध्यक्ष शासिकलाताई साळवे , बौद्धाचार्य संतोष मैंद , उपाध्यक्ष विस्वास जमधडे , संघटक रमेश निकम , कोषाध्यक्ष रावसाहेब वाघ ,गौतम वाव्हळ संजय भडांगे ,आम्रपाली भडांगे यांनी शिबिराला
मार्गदर्शन केले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपासिका शिबिरात बसलेल्या महिलांना प्रमाण पत्र देण्यात आले .
यावेळी मान्यवरचा सत्कार व प्रास्तविक शहराध्यक्षा अनिताताई ,साळवे ,सेक्रटरी उज्जवलाताई पवार,तसेच मायाताई खरे ,शरद पवार ,प्रमोद पवार आदींनी केले .
शिबीर यशस्वितेसाठी ता कमेटी अध्यक्ष पंडित भारूड ,अनिताताई साळवे उजवलाताई पवार आदी उपसिकांनी परिश्राम घेतेले शेवटी “सरणतयने ” शिबिराची सांगता झाली .