कोपरगाव तालुका
कर्मवीर काळे कारखाना सेवकांच्या पतपेढीची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची पतपेढी या संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आभाळे यांनी माहिती देताना सांगितले की,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या कामगारांना दैनदिन गरजेसाठी लागणारा उच्च प्रतीचा किराणा माल व इतर वस्तू वाजवी दरात पुरवठा करीत असून सभासदांना वैयक्तिक कर्ज पुरवठा करीत आहे. त्या माध्यमातून संस्थेला २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एकून २६ लाख ६७ हजार रुपयांचा नफा झाला आहे. माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर आहे. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देणार असल्याचे सांगत कामगारांना भरघोस पगारवाढ करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.सभेपुढे मांडण्यात आलेले १ ते १३ विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केले.
याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व संस्थेची जास्तीत जास्त वसुली, जास्तीत जास्त ठेव, व्याज व जास्तीत जास्त लाभांश घेणा-या सभासदांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काळे कारखान्याचे ऑफिस सुपरीटेडेट बाबा सय्यद,पतपेढीचे व्हा. चेअरमन कारभारी पावले,संचालक अविनाश कोल्हे, नानासाहेब सिनगर,आण्णासाहेब काळे, दिलीप वाके, बबनराव होन,बाबुराव खळे, राजेंद्र गवळी, सौ. प्रिया वसंतराव काळे, नितीन गुरसळ, कामगार संचालक अरुण पानगव्हाणे, आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मॅनेजर परमेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार अविनाश कोल्हे यांनी मानले.