नगर जिल्हा
बचतगटाच्या माध्यमातून स्त्री होत आहे स्वयंपूर्ण-नगराध्यक्षा पिपाडा
संपादक-
कोपरगाव (प्रतिनिधी )
बचत गटांच्या माध्यमातुन स्री शक्तीचा सन्मान प्राप्त होऊन त्या स्वयंपूर्ण होत असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे
राहाता नगरपालिकेच्या महिला बचत गट भवनात दिनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान तसेच महिला आर्थिक विकास महामंडळच्या स्री शक्ती लोक संचलित साधन केंद्र यांच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, सहाय्यक समन्वयक सुनिल पैठणे, राहाता ग्रामिण रुग्णालयाचे श्री भिंगारदिवे तसेच राहाता नगरपालिकेचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या की,महिलांनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. आजच्या युगाच स्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन पुढे जात आहे. घराची संपुर्ण जबाबदारी उचलायला ती आज उचलायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत यात महिलांसाठी ज्या योजना आणल्या त्यामुळे ख-या अर्थाने स्री शक्तीचा सन्मान झाला असे आपल्याला वाटत आहे. सर्व सामान्य कुटुंबाचा विचार करुन आपण उज्वला या योजनेच्या माध्यमातुन घराघरात गॅस पोहचविला,बारावी पर्यंतच्या विद्यार्थीनींना एस.टी.चा पास मोफत सुरु केला,माझी कन्या भाग्यश्री सारख्या योजनांनी स्री शक्तीचा सन्मान वाढविला आहे. महिलांच्या आरोग्यासाठी अस्मिता योजना प्रारंभ झाली असून युवतींसाठी वसतीगृह उभारण्यात आली आहे,नोकरी करणा-या महिलांसाठी वसतीगृह तयार झाली. पुनर्विवाह झाला तरी सेवा निवृत्ती देण्याचा निर्णय झाला. या व अशा अनेक योजना स्रीयांसाठी आणुन ख-या अर्थाने स्री ला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये या योजनेअंतर्गत लाभार्थींच्या कुटुंबासाठी पाच लाखापर्यंत आरोग्यविम्याची तरतूद करण्यात आली आहे.तरी या योजनेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी करून बचत गटांच्या माध्यमातुन महिलांना स्वतचे उद्योग व्यवसाय कऱणे सोपे झाले असल्याचे सांगितले आहे. स्रीशक्ती लोक संचलित साधन केंद्राच्य माध्यमातुन ग्रामिण भागातील गरीब व गरजु महिलांचा विकास कऱणे व त्यांचे राहणीमान उंचावणे या सारखे उपक्रम राबविले जात आहेत. याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेच्या हाताला काम आहे. उपस्थित सर्व महिलांचे नगराध्यक्षा पिपाडा यांनी कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्याहस्ते प्रत्येक बचत गटाला दहा हजार रुपया प्रमाणे फिरता निधी म्हणुन त्या धनादेशाचे वाटत करण्यात आले. सदर प्रसंगी आरोग्य शिबिर आयोजित केले यामध्ये