जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेत घाणीचे साम्राज्य- गंगूलेंचा आरोप

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत गोदावरी नदीला नुकत्याच आलेल्या पुरामुळे दुर्गंधी पसरलेली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचा आरोप कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गंगूले यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये केला आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव शहरात सलग चार-पाच दिवस पडलेल्या पावसाच्या पाण्याने सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पडलेल्या खड्ड्यामध्ये कोपरगाव नगरपरिषदेणे मुरूम टाकून रस्त्याची अब्रू झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या मुरुमाची माती झाली असून सर्वच रस्त्यावर या मातीचा धुराळा उडत आहे. शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहन गेल्यानंतर पायी चालणाऱ्या नागरिकांना या धुळीचा मोठा त्रास होत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेला रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मुरुमावर जेवढा खर्च आला असेल तेवढयाच खर्चामध्ये डांबर व खडी टाकून हे खड्डे बुजवून झाले असते असा दावा सुनील गंगूले यांनी केला आहे.

विशेषतः लहान मुलांना व जेष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषदेला रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी जेवढा खर्च मुरूम टाकण्यासाठी आला असेल तेवढयाच खर्चामध्ये डांबर व खडी टाकून हे खड्डे बुजवून झाले असते असा दावा त्यांनी केला असून कोपरगाव नगरपरिषदेने टाकलेला मुरूम नागरिकांच्या जीवावर उठला असून नागरिकांना डोळ्याचे व श्वसनाचे विकार जडण्याचा धोका वाढला आहे. त्यांना जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागू शकतो . शहरातील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यात टाकलेला मुरुम दुष्काळात तेरावा महिना ठरण्याचा धोका असल्याचेही सुनील गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close