जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सामाजिक मंडळांनी सामाजिक दायित्व जपण्याची गरज-काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगावसह तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी राज्यात आलेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत सामाजिक दायित्व जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.


कोपरगाव शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरिल मैदानात आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने कृष्णाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर ,आदी मान्यवरांसह आशुतोष काळे मित्र मंडळ, धर्म योद्धा शामभाऊ चव्हाण मित्रमंडळ, जय जगदंबा मित्रमंडळ, टायगर पॉइंट मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मित्रमंडळ सोनार वस्ती, हनुमान नगर मित्रमंडळ, आर्यन ग्रुप मित्र मंडळ आदी गोविंदा पथकांचे कार्यकर्ते काळे गटाचे कार्यकर्ते, नगरसेवक,विविध संस्थांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या वेळी सर्वच गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी चार थरापर्यंत प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

या दहीहंडी उत्सवाला कोपरगावच्या नागरिकांचा लक्षवेधी प्रतिसाद मिळाला असून अनेक गोविंदा पथकांनी उंचच्या उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एकाही गोविंदा पथकाला हि दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. शेवटी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या हस्ते व कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत ही मानाची दहीहंडी फोडण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात महापुरामुळे व कोपरगाव शहरात डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये कोपरगावसह, कोल्हापूर, सांगली व सातारा येथे पूरपरिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या सर्व कोपरगावकरांचा व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा आशुतोष काळे, तहसीलदार योगेश चंद्रे व अभिनेत्री रेशम टिपणीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उपस्थित मंडळाचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यावेळी आयोजकांनी आभार मानले.

कोपरगाव शहरासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकां पुन्हा उभारी मिळावी यासाठी आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये दिले.त्या बद्दल मराठी अभिनेत्री रेशमी टिपणीस यांनी आशुतोष काळे यांचे कौतुक केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close