निवड
…या बँकेच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवड जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचेकडील मार्गदर्शक सूचनानुसार बँकेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची निवड जाहिर झाली असून त्या सभेत श्रीकांत तिरसे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संचालक मंडळाबरोबरच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करणे आवश्यक आहे.प्रथम मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन व्यवस्थापन मंडळास रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता मिळालेली असून सदर व्यवस्थापन मंडळात श्रीकांत विठलराव तिरसे,राजेंद् माणिकराव ढोमसे,शरद रावसाहेब होन,रामराव विठ्ठलराव माळी,अॅड.शिरिषराव लोहकणे आदी पाच सदस्य असलेल्या व्यवस्थापन मंडळाची पहिली मासिक बैठक नुकतीच बँकेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्यात हीं निवड जाहीर झाली आहे.
सभेत श्रीकांत तिरसे यांच्या निवडीबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याआहे.
सदर प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुधाकर दंडवते,उपाध्यक्ष बापूराव जावळे सर्व संचालक मंडळ सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड तसेच सर्व अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.