कोपरगाव तालुका
शिरसगाव येथील शाळेची सांगली पुरग्रस्तांना मदत, विद्यार्थी सरसावले
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री.गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या तर्फे सांगली येथील पुरग्रस्त भागातील गरीब कुटुंबातील शाळकरी मुलांसाठी नुकतेच शालेय साहित्य पाठवले आहे.
राज्यातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तीन ऑगष्ट नंतर पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता.परिणामस्वरूप अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले होते.शाळा ,महाविद्यालये बंद ठेवण्याचा प्रसंग गुदरला होता.अनेक विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पावसात भिजून तर काही वाहून गेले होते.त्यांच्या संवेदना जाणून त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलने पुढाकार घेतला आहे.त्यांनी एक हजार वह्या ,पुस्तके, दोनशे पन्नास शालेय गणवेश शाळेतील मुलांच्या पालकांनी काही रोख स्वरुपात मदत केली यात गोविंद जाधव यांनी पाच हजार रुपये तर व्यंकटराव धट यांनी पाचशे रुपये दिले आहे. श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कुल शिरसगांव-सावळगांवमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दही हंडी फोडणार्या ग्रुपला पंधरा हजार रुपये बक्षीस दिले जाते यावर्षी तो कायक़्रम रद्द करुन यावर खर्च होणार्या पैशातुन पुरग्रस्त भागातील गरीब कुटुंबातील शाळकरी मुलांना शाळेसाठी लागणारे साहित्य पाठवले आहे. यावेळी श्री.गुरुदत्त इंग्लिश मिडीयमचे संस्थापक केशव भवर, संचालक स्वप्नील भवर, मुख्याध्यापक दिपक चौधरी, भागवत गुरुजी, रविकांत भवर, अमोल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.