जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या साठवण तलावांची उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव ( प्रतिनिधी)कोपरगाव नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात अहम भूमिका वठवणाऱ्या साठवण तलाव क्रमांक चार व पाचचे काम तातडीने सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी उद्या सोमवार दि.२६ ऑगष्ट रोजी संपन्न होणार असल्याची माहिती कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी जनशक्ती न्युजला दिली आहे.कोपरगावच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी माजी आमदार अशोक काळे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी २०११ साली मंजूर केला होता.परंतु हा निधी राजकीय स्रेय वादात परत गेल्यामुळे हा प्रश्न गेले आठवर्ष तसाच रेंगाळत पडला होता. यासाठी आपण कार्यकर्त्यांसमवेत अनेक वेळा आंदोलन करून, प्रशासकीय अधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. आमरण उपोषण व धरणे आंदोलन प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेने ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु कोपरगाव नगरपरिषदेकडून साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत सुरु असलेली चालढकल कोपरगावच्या नागरिकांना न परवडणारी होती. त्यामुळे तातडीने निर्णय घेवून ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम कोपरगाव नगरपरिषदेणे तातडीने सुरु करावे यासाठी कोपरगावच्या नागरिकांसाठी आपले कार्यकर्ते संदीप वर्पे,सुनील गंगूले,मंदार पहाडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

कोपरगाव पालिकेने तातडीने निर्णय घेवून ४ व ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी कोपरगावच्या नागरिकांसाठी आपले कार्यकर्ते संदीप वर्पे,सुनील गंगूले,मंदार पहाडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

सदरयाचिकेत महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या जनहित याचिकेची नियमितपणे सुनावणी सुरु आहे. परंतु कोपरगाव नगर परिषद, प्रांताधिकारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,जिल्हाधिकारी व शासनाकडून २३ जुलै रोजी ४ व ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली नाही. किमान आज तरी सुनावणीच्या वेळी कोपरगाव नगरपरिषदेने न्यायालयात उपस्थित राहून न्यायालयापुढे साठवण तलाव करणार की नाही हे स्पष्ट केले पाहिजे अशी सर्वसामान्य कोपरगावच्या नागरिकांची अपेक्षा असल्याचे आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close