जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

….तर कोपरगावातील गुंडांना पोलीस सरळ करतील-डॉ दीपाली काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)

आगामी काळात गणेशोत्सव व मोहरम सण एकत्र येत असून या काळात सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था राखणे हि प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे या काळात काही असामाजिक तत्त्वांनी अथवा गाव गुंडांनी यात व्यत्यय आणला तर पुढच्या गणेशोत्सवात ते कोपरगावात दिसणार नाही त्यांचा आपण चोख बंदोबस्त करू असा इशारा श्रीरामपुरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बजावले आहे.
आगामी काळात सोमवार दि.२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा मोहरम(ताजिया)हा सण येत असून आगामी कालखंडात सण महोत्सवाची मालिका असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालयात शांतता कमिटीची संयुक्त बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे होते.
सदर प्रसंगी शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर ,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे,उपनगराध्यक्ष योगेश बागुल,शहर सेनेचे अध्यक्ष सनी वाघ,भाजप शहराध्यक्ष कैलास खैरे,नगरसेवक जनार्धन कदम,कैलास जाधव,दीपक गायकवाड,रियाज शेख,फादर फ्रान्सिस,सरपंच पानगव्हाणे, विविध गावचे सरपंच,पोलीस पाटील,गणेश मंडळाचे पदाधिकारी नागरिक,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,तालुक्यात एक गाव एक गणपती हा कार्यक्रम स्तुत्य असून शहरातही हि संकल्पना राबविली तर उत्तम होईल.सामाजिक सलोखा हा कुठल्याही उत्सवासाठी आवश्यक असतो.तो आत्तापर्यंत टिकवला गेला तरी आपली या भागात नेमणूक होताना वरिष्ठांनी कोपरगावकडे जास्त लक्ष ठेवण्यास सांगितले असल्याने आपण सजग राहणार असून कुठलेही बेकायदा काम खपवून घेणार नाही.कुठलाही उत्सव जनतेच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.सर्वधर्म समान असून आपली आई कोल्हापुरात मोहरमच्या सवारीचे स्वतः पूजन करत असल्याचे सांगून सर्वधर्मांनी शांतता व समाजाचे कल्याण इच्छीले आहे.आमचे कर्तव्य वर्ष दोन वर्षे असते पण आपल्याला कायम एकत्र राहायचे असल्याने हा सलोखा टिकविणे हि आपलीच जास्त जबाबदारी असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
सदर प्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी आगामी काळात विधानसभा निवडणुका येत असल्याने संदेश देताना ते राजकीय नसावे याची काळजी घेण्याचे आवाहन करून उत्सव काळातील सर्व आचारसंहिता समजून सांगितली व सर्व परवानग्या आवश्यक असून त्यात कोणीही कुचराई करू नये.आक्षेपार्ह संदेश देऊ नये.दहा वाजे नंतर वाद्य वाजविण्यास व डी. जे वाजविण्यास उच्च न्यायालयाची बंदी असल्याचे बजावले.व परवानग्या देताना एक खिडकी द्वारे देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.व्यासपीठ रस्त्यावर उभारू नये.महावीतरणची वीज जोडणी आवश्यक असल्याचे बजावले.गणेश विसर्जनास वेळ निश्चित असल्याने जास्त वेळ कोणालाही मिळणार नाही फार तर पारंपरिक वाद्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करू असे आश्वासन दिले आहे.गणेशाच्या जवळ चोवीस तास दोन कार्यकर्ते ठेवणे आवश्यक असल्याचे बजावले काही अनुचित प्रकार घडल्यास ते मंडळाचे सदस्य जबाबदार राहतील असे सांगितले.
नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि तो जर चुकला तर त्याला कोणीही राजकीय अभय देऊ नये.असे सांगून मागील वर्षी गणेश वीसर्जनाचे वेळी गणपती मूर्तीची विटंबना टळली असल्या बद्दल सर्वच सामाजिक संस्थांचे कौतुक केले. विसर्जन मिरवणुकीचे वेळी एकाच व्यासपीठ राहणार असल्याचे बजावले.
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,राजेश परजणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर कैलास जाधव ,बबलू वाणी,सरपंच पानगव्हाने,विनोद राक्षे यांनी आपल्या सूचना मांडल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तर सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close