जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सार्वजनिक शांतता भंग, चौघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या बस आगाराच्या समोर भर रस्त्यात दुपारी चारच्या सुमारास आरोपी आदित्य सोपान भुजाडे,प्रवीण सोपान भुजाडे,दोन्ही रा.आपेगाव,आदिनाथ ज्ञानदेव आहेर,रा.अन्नपूर्णांनगर, कोपरगाव,व शिवाजी निवृत्ती दाभाडे रा.बोकटे ता.येवला यांनी आपसात एकमेकांना शिवीगाळ करून,आरडा ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करून आपापसात झुंज करताना मिळून आल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी नेमक्या अचूक वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने शहरात असे बेशिस्त वागणाऱ्यांवर चाप बसण्यास मदत होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

दरम्यान शहरात आपल्या दुचाकींना वेगळे व वैशिष्टयपूर्ण धुराचे नळकांडे (सायलंसर)बसवून त्याचा मोठा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांची सध्या बरीच प्रतिष्ठा (?)वाढली आहे.त्यामुळे या कर्णकर्कश आवाजाने शहरात ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून महिला व लहान बालके याना त्याचा खूपच त्रास होत असून शैक्षणिक संस्था ,दवाखाने त्यातील रुग्ण यांना खूप त्रास होत असल्याने शहर पोलिसानी या बाबत अचानक कारवाई करून (वाह्यात) गर्भश्रीमंतांना त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोपरगाव शहरात किरकोळ कारणाने वादावादी हि बाब नागरिकांना नवी नाही.कोपरगावात सामाजिक शांतता भंग होण्याच्या घटना वरचेवर होत असतात.विशेषतः बाजारच्या वारी म्हणजेच सोमवारी या घटनांना उत येत असतो.त्यामुळे बरेच जण आठवड्याची कामधंद्याची जी थोडीबहुत रक्कम येत असते ती घरप्रपंचास वापरण्या ऐवजी ती आपली दारूची तल्लफ भागविण्यासाठी खर्ची करत असतात.व विनाकारण किरकोळ कारणाने आव आणून शहराची सार्वजनिक शांतता भंग करीत असतात.असाच प्रकार आज दुपारी चारच्या सुमारास घडला दरम्यान हि घटना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे कानावर गेली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हि कारवाई केली व दंगा करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी आदित्य भुजाडे,प्रवीण भुजाडे,आदिनाथ आहेर,व शिवाजी दाभाडे यांच्यावर गु.र.नं.२८५/२०१९,भादवी कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. एस.तिकोने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close