जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा,एका महिलेने केले ध्वजारोहण,कोण हि महिला?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव नगरपरिषदेत आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास जेष्ठ स्वच्छता कर्मचारी महिला श्रीमती शकीला सय्यद यांचे हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह मान्यवरांच्या उपस्थितीत धजारोहन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झाली आहे.त्याचा जल्लोष आज सकाळी भारतभर पाहायला मिळाला त्याला कोपरगाव नगरपरिषद अपवाद नव्हती.कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आ. स्नेहलता कोल्हे व संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष,नगरपरिषद अध्यक्ष विजय वहाडणे यांचे प्रमुख उपस्थितीत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेचे ध्वजारोहण जुन्या नगरपालिका इमारतीसमोर करण्यात आले.

त्यावेळी,उपनगराध्यक्ष योगेश बागुल,नगरसेवक मेहमूद सय्यद,सत्येन मुंदडा,नगरपरिषद विरोधीपक्ष गटनेते विरेन बोरावके,शिवाजी खांडेकर,जनार्धन कदम,बाळासाहेब आढाव,विवेक सोनवणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी सभापती संजय जगताप,फकिरमामु सय्यद,संजय कांबळे,प्रा.सुभाष शिंदे,चेतन खुबानी,बाळासाहेब दीक्षित,उपमुख्याधिकारी विश्वास गोर्डे,आदींसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

ध्वजारोहण करणारी हि महिला कोण?

दरम्यान सकाळी नगरपरिषदेत ध्वजारोहण करणारी ही महिला कोण या बाबत कोपरगाव नगरपरिषद हद्दीत चर्चेला उधाण आले.व तिला हा सन्मान कसा मिळाला या बाबत चर्चा रंगली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता हि महिला नगरपरिषदेत स्वच्छता विभागात काम करत असून अस्थायी म्हणून त्यांनी दहा वर्षे तर स्थायी म्हणून पंधरा वर्षांपासून काम केले आहे.त्यांची या विभागात पंचवीस वर्षे सेवा बजावली आहे.विशेष म्हणजे नुकत्याच आलेल्या महापुरात आरोग्य व स्वच्छता विभागाने अंग झटकून काम केल्याने हा सन्मान या विभागास मिळावा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी जेष्ठ महिला व अल्पसंख्यांक म्हणून हा सन्मान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या महिलेला देऊन स्वच्छता विभागाचा सन्मान वाढवला आहे.

कोपरगाव तालुक्यात स्व आणि स्वतःचे कुटुंब या पलीकडे न पाहणाऱ्या बड्या नेत्यांच्या तालुक्यात या पूर्वीही विजय वहाडणे यांनी दरवेळी दुसऱ्यांनाच संधी दिली आहे हे विशेष!

गत तीन वर्षात कोपरगाव नगरपरिषद व स्व.माधवराव आढाव शाळेचे ध्वजारोहण वीर पत्नी श्रीमती सरला अमोल जाधव, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे, आरोग्य विभागाचे सुनील आरणे, पंपमन नारायण साबळे,माजी सैनिक राघवेंद्र वाडेकर,नगरसेविका विद्या सोनवणे, माजी मुख्याध्यापक श्री वाघ,परिचर सुधाकर मोरे,पर्यवेक्षक कुलकर्णी सर,उर्दू शाळा मुख्याध्यापिका श्रीमती इनामदार आदींना संधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून अनोखा पायंडा पाडला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातही ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले असून तेथे उपमुख्याधिकारी विश्वास गोर्डे यांनी ध्वजारोहन केले आहे.

नगरपरिषद ध्वजारोहनानंतर शालान्त परीक्षेत विशेष स्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगरसेवक,मेहमूद सय्यद,आदींसह बहुसंख्य पालक ,विद्यार्थी,नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमास उपस्थितांकडून तंबाखू सेवन न करण्याची व परिसर अस्वच्छ न करण्याची शपथ सूत्रसंचलक महारुद्र गालट यांनी वदवून घेतली आहे.उपस्थितांचे आभार सत्येन मुंदडा यांनी मानले.

दरम्यान या कार्यक्रमास आ. स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी प्रकुर्ती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close