कोपरगाव तालुका
सडे शिवारात अज्ञात तरुणांचा मृतदेह!
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील सडे ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदीपात्रातील विहिरीच्या कठड्याला साधारण पस्तीस ते चाळीस वर्षे वयातील एका अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात सडे ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदी पात्रात नुकताच सुमारे पावणेतीन लाख क्युसेसने महापूर येऊन गेला आहे.या महापुराने अनेकांचे प्रपंच उघड्यावर आणले.तर शहरात आलेल्या महापुराच्या पाण्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.त्यातच नुकताच पूर ओसरला आहे.त्यामुळे अनेकजण गायब झालेले इसम,गायब झालेल्या वस्तू उघड होऊ लागल्या आहेत.त्यातच सडे येथील कामगार पोलिस पाटील नानासाहेब पांडुरंग शेलार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली की,बुधवार दि.१४ ऑगष्ट रोजी दुपारी एक वाजेपुर्वी गोदावरी नदीपात्रात सडे ग्रामपंचायत हद्दीत कैलास सोपान बारहाते यांचे नदीपात्रातील विहिरीच्या सिमेंटच्या कठड्याला लागून एक अनोळखी पुरुह जातीचे (अंदाजे वय-३५-४०)प्रेत असून ते ओळखण्याच्या पलीकडे आहे.या बाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉं. राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने सडे शिवारात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.सदरचे प्रेत चासनळीच्या पश्चिमेकडील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.