नगर जिल्हा
आईवडिलांनी कष्ट केले म्हणून अमेरिकेत शिक्षणासाठी निवड . -दिपक जंगले.
नेवासा (वार्ताहर) – आयुष्यात कष्टाला गती देण्याचे काम आईवडील तसेच घरातील, परीसरातील, नातेवाईक यांनी केले म्हणूनच आज अमेरिकेत दोन वर्षासाठी मास्टर आँफ सायन्स इन इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ( MS) उच्च शिक्षणासाठी निवड झाली असल्याचे प्रतिपादन शिवाजी जंगले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
नेवासा तालुक्यातील पानेगाव ग्रामपंचायत हद्दीतील दिपक शिवाजी जंगले यांचा पानेगाव संस्था,पानेगाव ग्रामपंचायत, कै.पोपटराव पाटील संस्था तसेच ग्रामस्थांच्या वतीने पानेगाव संस्थेच्या सभागृहात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प दशरथ जंगले होते.
यावेळी दिपक जंगले यांचे आई वडिल हे शिक्षक सुन त्यांचे वडील शिवाजी जंगले यांनी दिपकच्या शिक्षणाबाबत माहिती दिली .ते म्हणाले की, पहिली ते पाचवी सेंट मेरीज नेवासा, पाचवी ते दहावी मुळा पब्लिक स्कुल शैनेश्वर विद्यालय सोनई दिपक हा मुळातच सर्व क्षेत्रात लहानपणापासुन अग्रेसर कुठलेहि काम करण्याची धडपड असायची जिद्द चिकाटी बळावर आज तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातोय एमपीएससी तसेच आयपीएस दर्जाचे हे शिक्षण आसल्याचे त्यांनी सांगुन आठ विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली त्यापैकी दिपक यामध्ये पास झाला. नक्कीच अभिमान वाटतो. लोकनियुक्त सरपंच संजय जंगले,हभप ज्ञानदेव गुडधे, किशोर जंगले बापूराव जंगले, श्रीकांत जंगले आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले,उपाध्यक्ष अशोकराव गागरे मुळाथडी पाणी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, राजेंद्र जंगले,जनार्दन जंगले बबनराव जंगले, कै.पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष रमेश गुडधे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले, सुर्यकांत टेमक ठकाजी बाचकर पोपटराव महानोर,अमित जंगले उदय जंगले,रितेश जंगले सोपानराव जंगले,निवत्ती जंगले, सुरेंद्र जंगले सोपान चिंधे प्रस्ताविक श्रीकांत जंगले सुत्रसंचालन सुभाष गुडधे आभार रमेश जंगले यांनी मानले त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील दिपक शिवाजी जंगले यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत निवड झाल्याबद्दल गावच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आनुभव विशद करताना दिपक जंगले यावेळी सरपंच संजय जंगले, जालिंदर जंगले दत्तात्रय घोलप आदी मान्यवर( छाया- बाळासाहेब नवगिरे)