जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद आले कसे ?

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात प्रसिद्ध अभिनेते व दानशूर समाजसेवक सोनू सूद “यांनी गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुमारे दहा लाख रुपयें किमतीचे शंभर भ्रमणध्वनी भेट देऊन ऑनलाईन शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे या उपक्रमामुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्यांचे कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आभार मानले आहे.

ऑनलाइन शिक्षण पद्धती चांगली असली तरी बहुतांश विद्यार्थ्यांकडे तशा सुविधा नाहीत.सर्व विद्यार्थी या शिक्षण पद्धतीच्या प्रवाहात येण्यासाठी त्यांना विविध माध्यमांतून हे शिक्षण उपलब्ध कसे करून देता येईल याबाबत आपणाला प्रश्न निर्माण झाला होता त्यातून हा उपक्रम घडून गेला आहे-विनोद राक्षे,कार्यकर्ता

नगर जिल्ह्यातील ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव नाही,अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा मानस जिल्हा जिल्हा प्रशासनामार्फत अलीकडेच व्यक्त केला गेला होता,मात्र आता नगर जिल्ह्याच्या ग्रामीणबहुल भागातही करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या शाळा बंदच राहणार असे चित्र आहे.त्यातच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शैक्षणिक धडे देण्याचेही प्रयोजन करण्यात आले होते,मात्र जिल्हा परिषद आणि नगरपरिषद हद्दीतील बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अद्यावत भ्रमणध्वनी तसेच ग्रामीणबहुल भागात बीएसएनएलच्या नेटवर्कचा अभाव व विविध तांत्रिक अडचणी असल्याने हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना दुरापास्तच राहण्याची भीती वाटत असताना कोपरगावात प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते सोनू सूद यांनी कोपरगाव नगर परिषद हद्दीतील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी मोफत दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सदर प्रसंगी सोनू सूद यांची धर्मपत्नी सोनाली सूद,मुलगा इशांत सूद,नीती गोयल,नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,विजय आढाव,माजी नगरसेवक बबलू वाणी,संदीप देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमास कोपरगावातील विविध राजकीय दिग्गज नेते उपस्थित नसल्याबाबत छेडला असता त्यांनी,”या सामाजिक कार्यक्रमास कोणीही राजकीय नेता उपस्थित नको” अशी अटच घातली होती हि बाब अधोरेखित केल्याने नेत्यांच्या अनुपस्थितीचा उलगडा झाला आहे.त्यामुळे उत्सवप्रिय नेत्यांचे हे आक्रीत उघड झाले आहे.

कोपरगाव शहरांतील कार्यकर्ते विनोद राक्षे यांनीं हा योग्य जुळवून आणला असल्याची माहितीही नगराध्यक्ष वहाडणे यांनी दिली आहे.यावेळी नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण,नगरपरिषद कर्मचाऱ्यांनीं कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान दिल्याने त्यांचा “कोरोना योध्ये” म्हणून सोनू सूद यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला असून त्यांना सन्मानपत्र प्रदान केले आहे.त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हा कार्यक्रम कसा घडून आला ?

दरम्यान हा कार्यक्रम कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा राक्षे यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते विद्यार्थी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद राक्षे यांनी आपल्या बंधूंचे निधन घडलेले असतानाही घडवून आणला आहे हे विशेष ! या बाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण सोळा वर्षांपूर्वी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते असताना त्यांचा व आपला नागपूर येथे दांडिया स्पर्धांच्या निमित्ताने परिचय झाला होता व तो पुढे मैत्रीत रूपांतरित झाला असल्याचे सांगितलें आहे.त्यातून शिर्डीतील निघोज हेलिपॅड उदघाटन प्रसंगी तो आणखी वृद्धिंगत झाला होता.ते शिर्डीत साई दर्शनाला अनेक वेळा रेल्वेने येत असत त्या-त्या वेळी आपण उपस्थित राहात असत.कोरोना काळात आपण कोपरगावातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण घेताना अडचण येत असल्याचे त्यांचे निदर्शनात आणले होते.त्यांनी याबाबत आपणाला या विद्यार्थ्यांना मदत करायला आवडेल असे सांगितल्याने आपला हुरूप वाढला होता.त्यातून हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मदतीने संपन्न झाला असल्याचे गौरवाने सांगितले आहे.व त्या सामाजिक कामातून त्यांना आनंद मिळत असल्याचे म्हटले आहे.दरम्यान या कार्यक्रमास कोपरगावातील विविध राजकीय दिग्गज नेते उपस्थित नसल्याबाबत छेडले असता त्यांनी या सामाजिक कार्यक्रमास कोणीही राजकीय नेता उपस्थित नको अशी अटच घातली होती हि बाब अधोरेखित केल्याने नेत्यांच्या अनुपस्थितीचा उलगडा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close