कोपरगाव तालुका
पेन येथील आरोपींस फाशी द्या-कोपरगावात मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पेन येथील आदिवासीं अल्पवयीन बलात्कार तीस ठार मारणाऱ्या आरोपी मधुकर पाटील यास फाशी देण्यात यावी अशी मागणी कोपरगाव येथील आदिवासी महादेव कोळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अमित चंद्रकांत आगलावे यांनी नगर येथील जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोकण विभागातील पेण येथे आदिवासी मुलीवर नुकताच एका नराधमाने बलात्कार करण्यात केला आहे.त्यात सदर मुलगी ठार झाली आहे.त्याचे पडसाद कोपरगावतही उमटले आहे.
कोकण विभागातील पेण येथे आदिवासी मुलीवर नुकताच एका नराधमाने बलात्कार करण्यात केला आहे.त्यात सदर मुलगी ठार झाली आहे.त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहे.कोपरगावात या घटनेचा नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत आगलावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,त्या व्यक्तीस दिशा कायदयानुसार कठोर कारवाई करावी अन्यथा अन्य आरोपींना धाक बसणार नाही.व असे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही.
या निवेदनाद्वारे पेन जिल्हा रायगड येथे दि ३० डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेत आरोपी आदेश मधुकर पाटील याने साबर सोसायटी,मोतीराम तलावा जवळ बलात्कार केला होता.त्यात त्या अडिच वर्षीय आदिवासी चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्या नराधमावर पोस्को अंतर्गत,अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांव्ये,खुनाचा गुन्हा दाखल करून दिशा शक्ती कायद्यानुसार फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आदिवासी विकास मंत्री
अँड.के.सी.पाडवी यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन लावून नराधमाला तत्काळ अटक करून त्याच्यावर निवेदनात दिल्यानुसार गुन्हे दाखल करा असे आदेश देण्यात आले असल्याची माहितीही शेवटी दिली आहे.