जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या आधी आपल्या माता-पित्यांचे फलक लावा-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात वाढदिवसाचे फलक न लावण्याबाबत निर्णय झाला आहे या निर्णयाचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण,रस्ते खोदणे रहदारीला अडथळे कमी झाले आहेत अशा स्थितीत न राजकीय नेत्त्यांनी आपल्या मिरवण्याच्या हौसेला जरा आवर घातली व आधी आपल्या माता-पित्यांचे फोटो आपल्या घरात व घराबाहेर लावले तर शहरात काही चांगल्या रूढी-परंपरा सुरु होतील असा उपरोधिक सल्ला कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये नुकताच दिला आहे.त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील त्याच त्या नेत्यांचे तेच चेहरे पाहण्याचे आकर्षण जनतेत नाही हे लक्षात घ्यावे.ज्यांना नेत्यांचे-स्वतःचे फलक लावण्याची फार हौस आहे त्यांनी आधी स्वतःच्या माता पित्यांच्या वाढदिवसाचे फलक स्वतःच्या घरावर लावावेत,उगीच शहराचे विद्रुपीकरण करू नये व शहरातील सामाजिक ऐक्य धोक्यात घालू नये हे उत्तम -विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

राजकीय नेत्यांना प्रसिद्धीची मोठी हौस असते ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेत असतात.आड पडद्याने का असेना ते स्वतःची प्रसिद्धी स्वतःच करून घेत असतात.किरकोळ-किरकोळ प्रसंगही त्यांना या प्रसिद्धीसाठी पुरेसे ठरतात.कोणी लक्ष देवो नाहीतर ना देवो ते स्वतःचे फलक लावून घेणारच.कोणी आपल्याकडे लक्ष दिले नाही तर जगबुडी होईल हि एकच भीती त्यानां रात्रंदिन सतावत असते.त्यामुळे निवेदने टपालाने पाठवले तरी त्याची हास्यास्पद बातमी करण्याकडे या लोकांचा मोठा कल वाढल्याचे सार्वत्रिकरित्या दिसून येत आहे.ते आड पडद्याने का होईना आपली स्तुती स्वतःच करत असतात त्यामुळे आपल्या या कृतीचा कोणाला किती आणि कसा त्रास होतो याचे त्यांना काही देणे घेणे व भान नसते.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.येनकेन प्रकारे त्यांनी शहराला वेठीस धरलेले दिसते.नुकत्याच एका उदघाटन फलकाचे विद्रुपीकरण झाले त्याने आरोप प्रत्यारोप झाले आहे.दुसऱ्या दिवशी आपले पाप झाकण्यासाठी दुसराही फलक फाडण्यात आला.तो त्यांनी स्वतः फाडला की विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फाडला हा पोलीस तपासाचा भाग आहे.मात्र नेत्यांनी आपली प्रसिद्धीची थोडी हौस कमी केली तर बऱ्याच समस्या निर्माण होणार नाही मात्र याबाबतीत नेत्यांचे भान गेले आहे.याचा दाहक अनुभव सध्या कोपरगावच्या जनतेला येत आहे.हे सर्व पक्षीय राजकिय नेते-कार्यकर्ते महापुरुषांचे जयंती,पुण्यतिथी,वाढदिवसाच्या नावाखाली स्वतःच्याच प्रतिमा शहरभर फलकाद्वारे लावत सुटतात.काहीजण वेगवेगळ्या धर्मांचे सण-उत्सव याचे निमित्ताने स्वतःच्या फोटोसह फलक लावत असतात.महापुरुष,देवादिकांच्या फोटोपेक्षा नेत्यांचेच फोटो बऱ्याच वेळा मोठे दिसतात.प्रत्येक प्रसंगाचे केवळ निमित्त हवे असते.कसेही करून ” शुभेच्छा” देण्याचा धडाका नेते व प्रमुख कार्यकर्त्यांनी लावला आहे.नेत्यांच्या शुभेच्छा वाचून जनतेचे काहीही अडले आहे असे कधीही आढळलेले नाही.जनतेबद्दल त्यांना इतके प्रेम आहे तर निवडणुकीत दारू आणि पैसा यांचा भडिमार का करतात याचे सार्वत्रिक उत्तर यांनी द्यायला हवे पण हसे घडणार नाही असो.

या बाबत नगराध्यक्ष वहाडणे यांची प्रतिक्रिया फार बोलकी ठरली असून त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,” बऱ्याच वेळेला नगरपरिषदेला नाईलाजाने विनापरवाना फलक जप्त करावे लागतात.एखादा फलक फाडला,विटंबना झाली तर अकारणच वातावरण बिघडून जाते. नगरपरिषद प्रशासनावरील ताण तणाव वाढतो.परवानगी घेऊन फलक लावण्यास परवानगी दिली तरी कुणीही डॉ.आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधीजी आदी महापुरुषांचे पुतळे किंवा त्याचें जवळ कापडी फलक लावू नयेत हे उत्तम.रस्ते खोदून,व्यावसायिकांना अडथळे करून कुणीही फलक लावणे योग्य नाही.परवानगी घेतली याचा अर्थ कुठेही-कसेही फलक लावून कारवाई करायला नगरपरिषदेस भाग पाडू नये.देव-धर्म-महापुरुष यांच्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेवर प्रेम करणाऱ्यानी भान ठेवून वागावे हिच अपेक्षा असल्याची कोपरखिळी त्यांनी मारली आहे.व नेत्यांचे तेच तेच चेहरे पाहण्याचे आकर्षण जनतेत नाही हे लक्षात घ्यावे.ज्यांना नेत्यांचे-स्वतःचे फलक लावण्याची फार हौस आहे त्यांनी आधी स्वतःच्या माता पित्यांच्या वाढदिवसाचे फलक स्वतःच्या घरावर लावावेत असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या निमित्ताने शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close