जाहिरात-9423439946
संपादकीय

नुसती ‘लाज’ वाटून उपयोगाची नाही …

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगावचे तहसील तहसीलदार विजय जबाजी बोरुडे व त्यांना लाच घेण्यात मदत करणारा आरोपी गुरमितसिंग दडियाल या दोन आरोपींना वाळूचोरीतील वाहनावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना नुकतीच अटक करण्यात आली होती असताना यात आणखी एक मंडलाधिकारी,तलाठी,एक तहसील येथील कनिष्ठ कर्मचारी,कोतवाल,आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत इसम सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्या मुळे या वाळूचोरीत आणखी मासे अस्तित्वात असून त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.दरम्यान यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगावच्या तहसील प्रकरणी आपल्याला लाज वाटली असल्याचे म्हटले आहे.मात्र यात ‘लाज’ वाटून उपयोगाची नाही त्यावर सत्वर कारवाई गरजेची आहे.

या पूर्वी याच विजय बोरुडे या तहसीलदार महाशयांने एका वैद्यकीय विभागात सेवा देणाऱ्या महिलेचा मद्यधुंद अवस्थेत विनयभंग केला होता.एवढ्यावर हि स्वारी थांबली नाही त्याने पोलीस अधिकाऱ्यांचा उद्धटपणे उद्धार केलाच पण कोपरगाव तालुक्यातील दोन प्रस्थापित राजकारण्यांच्या तीन पिढ्यांचा लौकिक (?) वाढवला होता.त्या बाबतच चलचित्रण उपलब्ध असताना त्याला कोणी अभय दिले ? त्यावर कारवाई का झाली नाही ? त्याला सन्मानाने कोणी त्याच पदावर पुन्हा विराजमान केले ? एवढ्यावर न थांबता त्याने सदर बाधित महिलेचा जबाब बदलविण्यास मदत न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आपल्या समर्थकांकडून व पालक मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कोणी दबाव आणला ? याचे उत्तर घोषणा करणारे व शरमेने खाली मान घालणारे नेते आणि त्यांचे सहकारी देणार आहे का ?

सरकारचे वाळू धोरण जाहीर होऊनही अद्याप सामान्य माणसांना वाळू भेटत नाही त्यामुळे ते आपल्या विकास कामांसाठी सैरभैर झालेले दिसत असून त्यांना नाईलाजाने वाळू माफियाकडून वाळू विकत घ्यावी लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सार्वत्रिकरित्या दिसत आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अद्याप वाळू मिळत नाही मात्र महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने मात्र पर्यावरणाची ऐसीतैसी करत गोदावरी नदीतून वाळू माफियाकडून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उचलली जात आहे.यावर कुठलीही संघटना आवाज उठवताना दिसत नाही.त्यातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे फावत असून त्यातून अधिकारी हप्ते घेऊन आपली तुंबडी भरत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूचोर बेभान झाले असून त्यांना राजकीय अभय मिळत असल्याने ते आता अधिकाऱ्यांना मोजत नसल्याचे उघड होत आहे.अधिकारी जास्तीचा आर्थिक हव्यास पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असल्याचे दिसून येत आहे.त्यातच वाळूचोरही त्यांच्या पुढची आवृत्ती झाले असून ते मोबाईल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोभी अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकविण्याची कसर सोडताना दिसत नाही.यातील महसूल विभागाविरुद्ध हि चौदावी कारवाई केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी (वय-३३) यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे याने आपल्या गुरमितसिंग दडीयाल या हस्तकांमार्फत शुक्रवार दि.१९ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तहसील नजीक असलेल्या हॉटेल मध्ये २० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यावर नाराज होऊन फिर्यादीने हा सापळा लावला होता.त्यातून कोपरगावचा तहसीलदार विजय बोरुडे (वय-४४) हा आपल्या हस्तकांमार्फत सुमारे २० हजारांचा हप्ता पंचासमक्ष घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप्पधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाकडून पडकले गेले आहे.त्यांना सहकार्य करणारा इसम गुरमीतसिंग दडियाल (वय ४०) रा.कोपरगाव याचा त्यात समावेश असल्याचे उघड झाले होते.मात्र या कारवाईत अटक झालेला अधिकारी आणि त्याचा हस्तक एवढ्यावर हे प्रकरण थांबलेले नाही त्यात आणखी काही लोक सामील असल्याची माहिती हाती आली आहे.त्यात आणखी एक मंडलाधिकारी,तलाठी,एक तहसील येथील द्वारपाल,कोतवाल,आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत इसम आदी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे वर्तमानात लाचखोर अधिकारी अडकले जात असताना मुजोर वाळूचोरांना कोण आवरणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.या वाळूचोरांचे मोठमोठे इमले तयार होत असून त्यातील काही हद्दपार होऊनही पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुटून पुन्हा या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुंतविण्यात मग्न झाले असल्याचे दिसत आहे.ते नुसते नगर जिल्ह्यात कार्यरत नाही तर नाशिक जिल्ह्यातही कार्यरत असून यातील एका संशयिताने आता पर्यंत महसुली अधिकारी आणि कर्मचारी आदींनी अडकविण्यात डझनावारी ओलांडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.यात राजकीय आशीर्वाद देणारे राजकीय नेते की,लाच घेणारे महसूल अधिकारी,पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणारे नदी काठचे ग्रामस्थ,कोण दोषी आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.यातून वाळूचे भस्मासुर निर्माण होत आहे हे मात्र नक्की.यावर राजकीय धुरीण,पर्यावरण प्रेमी नागरिक आणि समाजाला विचार करावा लागणार आहे.

या कारवाईत अटक झालेला अधिकारी आणि त्याचा हस्तक एवढ्यावर हे प्रकरण थांबलेले नाही त्यात आणखी काही लोक सामील असल्याची माहिती हाती आली आहे.त्यात आणखी एक मंडलाधिकारी,तलाठी,एक तहसील येथील द्वारपाल,कोतवाल,आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत इसम आदी सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे वर्तमानात लाचखोर अधिकारी अडकले जात असताना मुजोर वाळूचोरांना कोण आवरणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले.यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की,”कोपरगावमध्ये तहसीलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.वाळूसाठी तो हफ्ता घेत होता.वाळूच्या बाबतीत आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात,याची आम्हाला लाज वाटते आहे.सरकारी वाळू डेपोसाठी प्रशासनातील या लोकांनी ठेकेदारांशी संगनमत केले आहे.परंतु त्यांना आता सरळ केले जाईल.महिन्याभरात सर्वसामान्यांना घरपोच वाळू मिळेल” अशी राणा भीमदेवी घोषणा केली आहे.ती खरेच वास्तवात येईल ?

या पूर्वी याच विजय बोरुडे या तहसीलदार महाशयांने एका वैद्यकीय विभागात सेवा देणाऱ्या महिलेचा मद्यधुंद अवस्थेत विनयभंग केला होता.एवढ्यावर हि स्वारी थांबली नाही त्याने पोलीस अधिकाऱ्यांचा उद्धटपणे उद्धार केलाच पण कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांच्या तीन पिढ्यांचा लौकिक (?) वाढवला होता.त्या बाबतच चलचित्रण उपलब्ध असताना त्याला कोणी अभय दिले ? त्यावर कारवाई का झाली नाही ? त्याला सन्मानाने कोणी त्याच पदावर पुन्हा विराजमान केले ? एवढ्यावर तो थांबला नाही त्याने सदर बाधित महिलेचा जबाब बदलविण्यास मदत न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आपल्या समर्थकांकडून व पालक मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कोणी दबाव आणला ? याचे उत्तर घोषणा करणारे व शरमेने खाली मान घालणारे नेते आणि त्यांचे सहकारी देणार आहे का ? सदर बेजबाबदार अधिकाऱ्याची त्याच वेळी शिक्षा करून बदली केली असती किंवा त्यास बडतर्फ केले असते तर आज मंत्री महोदय आणि त्यांचे समर्थकांवर,’खाली मान घालण्याची’ हि दुर्दैवी वेळ आली नसती.मात्र हि वरवर दिसते एवढी सोपी गोष्ट नाही या मागे मोठे अर्थ कारण असते हि बाब समाजापासून दडून राहिलेली नाही.

मात्र या घोषणा करणाऱ्यांचा या पूर्वीचा तसा लौकिक नक्कीच नाही त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.तो त्यांनी आपल्या कथनी करणीचा मेळ घालून सिद्ध करून द्यावा लागणार आहे.नुसती ‘लाज वाटून’ उपयोगाची नाही ‘त्या’ असामाजिक तत्वांवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय न देता सत्वर व गंभीर कारवाई होणे गरजेचे आहे.अन्यथा हे वाळूच्या भ्रष्टाचाराचे नाग तुम्हाला वेढण्यास कमी करणार नाही’अजून वेळ गेली नाही कारवाई करा…अन्यथा येरे माझ्या मागल्या’….अशी स्थिती होऊ शकते याचे भान ठेवा.

वाचकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवाव्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close