जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पूरग्रस्तांना कोपरगाव मुस्लिम समाजाची ५४ हजारांची मदत!

जाहिरात-9423439946

नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)कोल्हापूर व सांगलीत नुकत्याच संपलेल्या पा\वसाने मोठे आर्थिक नुकसान केल्याने त्यांना माणुसकीच्या नात्यातून मदत करण्याचा निर्णय कोपरगाव शहर मुस्लिम संघटनेने घेतला असून त्या अंतर्गत ५४ हजारांची मदत ईदगाह मैदानावर जमा करण्यात आल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव शहरासह नुकतीच भारतभर बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.बकरी ईद हि बलिदानासाठी ओळखली जाते.या पवित्र दिवसाचे औचित्य साधून कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी पूरग्रस्तांना मदत देण्याची संकल्पना मांडली त्याला सर्वच जेष्ठ कार्यकर्ते व नागरिक यांनी अनुमती दिली.त्यात सर्वाधिक मदत येथील व्यापारी सद्दामभाई सय्यद यांनी एकवीस हजार रुपयांची मदत दिली.तर नगरसेवक मेहमूद सय्यद व जुनेद शेख यांनी प्रत्येकी पाच हजाराची मदत जाहीर केली आहे.हि मदत गोळा करण्यासाठी कोपरगाव मुस्लिम विकास कमिटी व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले आहेत.काल कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे कडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रमुख कार्यकर्त्यानी हि मदत मोहम्मद खान यांचे हस्ते सुपूर्त केली आहे.

सदर प्रसंगी मौलाना आसिफ, मौलाना मुख्तार,नगरसेवक मेहमूद सय्यद,सुशांत घोडके,तुरुंगाधिकारी देशमुख,अस्लम शेख,अकबर शेख,आय्युब शेख,निसार शेख,जब्बार शेख,इम्तियाज अत्तार,मुन्ना मन्सुरी,फकीर महंमद पहिलवान,आययुब कच्छी, साजिद पेंटर,हुसेन तांबोळी,फारूक बागवान,वसीम शेख,चांद कुशन्स,सोनू शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार ग्रुपचे मोहसीन सय्यद,रईस शेख,शकील सय्यद,बंटी शेख,इम्रान शेख,अज्जू सय्यद,आरिफ शेख,पप्पू सय्यद,तौसिफ खाटीक,भुऱ्या सय्यद आदींनी परिश्रम घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close