कोपरगाव तालुका
कोपरगावात डेंग्यूचा कहर,फवारणीचे मात्र चालले ढोंग?
नानासाहेब जवरेकोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव शहरात गत महिनाभरात डेंग्यूच्या आजाराने शहराला विळखा घातला असून शहरात जवळपास शंभरावर रुग्ण विविध दवाखान्यात उपचार घेत असून त्यावर या रुग्णाचे हजारो रुपये खर्च होत असून दोन ते तीन रुग्ण दगावल्याची माहिती हाती आली आहे.या रुग्णामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुलगा व वरिष्ठ अधिकारीही सुटलेले दिसत नाही मात्र यावर उपाययोजना करताना पालिकेला अपेक्षित वेग गाठता आलेला नसल्याने कोपरगावच्या लोकप्रतिनिधिने आपल्या सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा कामाला जुंपली मात्र या यंत्रणेने केवळ फलकबाजी करून शहरात पाण्याचे फवारेच मारत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे जेष्ठ कार्यकर्ते अलिम शहा यांनी केला असून फवारणीचे पाणी आपण जनतेसमोर पिऊन दाखवल्याचा दावा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केल्याने खळबळ आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात गत १९ जुलै पासून पावसाने ठाण मांडले होते त्यामुळे कोपरगावसह राज्यात आकाश आभ्राछादीत राहिले त्यामुळे अशा वातावरणात सूक्ष्म जंतूंची वाढ होते हे सामान्य ज्ञान आरोग्य विभागाला असणे आवश्यक आहे.मात्र त्याचाच अभाव वर्तमान स्थितीत दिसत असून शहरात या बेपर्वाईमुळे मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे शहरात आरोग्याची ऐसी की तैसी झाली आहे.यात गांधीनगर या उपनगरातील राजेंद्र वाकचौरे या चालकांचा मुलगा गणेश वाकचौरे हा सात ते आठ वर्षाचा बालक बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या खेरीज याच उपनगरात आणखी एक बालक बळी गेला असून लोणी येथिल ग्रामीण रुग्णालयात जवळपास ७० ते ८० रुग्ण उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली असून आपल्या घरातील दोन रुग्ण या रुग्णालयात भरती होते अशी माहिती दिली आहे.
दरम्यान डेंग्यूच्या रुग्णात कोपरगाव नगरपालिकेचे एक प्रमुख पदाधिकारी यांचा जेष्ठ मुलगा व पालिकेचे प्रमुख अधिकारीही या आजाराचे बळी ठरले असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान काल सोमवारच्या दिवशी कोपरगाव शहर मनसेने शहरातील मुख्य चौकात एक फलक लावून नागरपरिषेच्या कामाचा निषेध केला असून कोपरगावच्या लोकप्रतिनिधी यांनी शहरात आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन फलक लावून सुरु केलेली फवारणी हा बनाव असून आपण स्वतः फवारणीच्या औषधांचे पाणी बाटलीत घरून पिऊन दाखवल्याचा दावा केला असून सदरचे फोटो सामाजिक संकेत स्थळावर चांगलेच प्रसारित झाले असून शहरात या बनावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन गायकवाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण पंधरा दिवसा पूर्वीच सदर रुग्णालयाचा प्रभार सोडला असून तो डॉ.कृष्णा फुलसुंदर यांचेकडे दिल्याचा दावा केला आहे.या बाबत डॉ.फुलसुंदर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.दरम्यान या बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात रुग्ण वाढल्याचे मान्य करत त्यासाठी साधारण एक ऑगष्ट पासून डबक्यांवर मॅलेथॉन ऑईल ,बी. एस.सी.पावडर,फॉगिंग मशीनच्या सहाय्याने धुराची फवारणी आदी प्रतिबंधात्मक फवारण्या सुरु असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान शहरातील चौकात मनसेचे जेष्ठ कार्यकर्ते अलिम शहा यांनी लोकप्रतिनिधींच्या फवारणी करणाऱ्या रिक्षाच्या टाकीत कुठलेही प्रतिबंधात्मक औषध नसल्याचा दावा करून ते एका बाटलीत घेऊन घटघटा पिऊन टाकल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच सेनेचे सत्ताधारी गटाचे समर्थक व स्वीकृत नगरसेवक व एक माजी नगरसेवक धावत आले व त्यांनी सत्ताधाऱ्यांचे समर्थन करून त्यांची बदनामी करू नका अशी हरकत घेतली त्यावरून दोन्ही गटात बाचाबाची झाल्याची माहिती आहे.