जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माणसामधील संवेदना जागविण्याचे मोठे आव्हान-डॉ.सावजी

जाहिरात-9423439946

नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)-वर्तमान काळात माणसामाणसा मधील संवेदना नष्ट होत चालली असून ही संवेदना जागविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून माणुसकीला पुन्हा हाक देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.कोपरगाव शहरातील लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी स्थापन केलेल्या हेल्पिंग हंँड्स या सेवाभावी संस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थांना उच्च शिक्षणाकरिता आर्थिक मदतीचे धनादेश नुकतेच वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील होते.सदर प्रसंगी डॉ. इंद्रवदन दोडिया,लेखा परीक्षक .दत्तात्रय खेमनर,सुलाखेताई ,छाया वाकचौरे अशोक खांबेकर, डी .यु. जोशी,ज्ञानेश्वर वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,वर्तमानात स्वतःपुरता ,माझा विचार करण्याची आपमतलबी प्रवृत्ती बळावत चालली ती समाजासाठी घातक आहे त्यासाठी जीवनात दूरदृष्टी असणे गरजेचे आहे.ज्याच्या अंगी दूरदृष्टी तेच जनसामान्यात स्मरणीय ठरतात. महाभारतात पांडवांनी सैन्य आणि भगवान कृष्ण यापैकी निवड करताना संख्येची नव्हे तर गुणवत्तेची (श्रीकृष्ण) निवड केली याचे उदाहरण दिले.आपल्या जीवनात आपण व्यापारी वृत्ती जोपासली पाहिजे पण ती इतरांना श्रीमंत करण्यासाठी असावी. देणारे दाते भरपूर आहेत मात्र योग्य गरजूंची भेटच होत नाही हे दुर्दैव आहे. अशा गरजूपर्यंत पोहचण्यासाठी हेल्पिन्ग हँडसने म्हणून कार्य करावे.दान देणाऱ्याने देताना हात जोडून द्यावे त्यात कृतज्ञतेची भावना असावी . देणारे व घेणारे समपातळीवर हवे.अहंकार नेहमी वाईट नसतो.गांधी, विवेकानंद, तुकाराम ज्ञानेश्वर हे त्याचे जिवंत उदाहरणे आहेत. ज्याला आपल्या आतला आवाज ऐकू येतो तो यशस्वी, तोच अहंकार मोठी कामे घडवतो जीवन घडवतो. सकारात्मक अहंकार प्रत्येकाने बाळगला पाहिजे.गरजा कमी असल्या तर जगणे सहज सोपे होते, मूलभूत गरजांना कमी पैसे लागतात गरजांच्या पुढे गेल्यावर पैसे कमी पडतात.आज मुलांच्या जीवनातील आव्हान आज संपले आहेत पालक शाळेच्या बस पर्यंत सोडायला जातात .एक अर्थाने आपण आपल्या मुलाला पंगू बनवत आहोत.ज्यांच्या आयष्यात आव्हान नाही ते यशस्वी होत नाही आपली ध्येय संधीमध्ये परिवर्तित करता येऊ शकते का त्याचे आत्मपरीक्षण करा. त्यांच्या आयुष्यातील ध्येय ,आव्हान संपवू नका,.ताठ मानेने व प्रसन्न चेहऱ्याने त्यांना जगता आले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक दत्तात्रय खेमनर यांनी केले ते म्हणाले की, हेल्पिंग हंड्स या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा असून सन २०१० पासून ६१ विद्यार्थांना २२ लाख सत्तर हजार रुपयांची मदत करण्यात आली चालू वर्षी ३६ मुलांपैकी ३२ मुलांना ६ लाख ६५ हजार रुपयांचे मदतीचे धनादेश आज वाटप करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थीना आजवर मदत केली ते आता नौकरीला लागल्यानंतर परतफेड करून मदतीचा हातभार लावत आहे. आज तुम्ही घेणाऱ्याच्या रांगेत उभे आहात मात्र मला तुम्हाला देणाऱ्यांच्या रांगेत उभे राहिलेले पाहायचे असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,इंद्रवादन डोडिया, भाऊ थोरात,खेडकर गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. गणेश देशमुख यांनी, आभार विठ्ठल शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close