नगर जिल्हा
शिर्डीत सांगलीच्या पूरग्रस्तांना केली मदत गोळा
कोपरगाव(प्रतिनिधी)राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर नगर जिल्हा व ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने शिर्डीमध्ये कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्याने गेले काही दिवसांपासून थैमान घातले आहे.वर्तमान स्थितीत नागरिकांपर्यंत मदत मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातून विविध ठिकाणाहून मदत गोळा करण्यास सामाजिक संघटनांनी प्रारंभ केला आहे.शिर्डीतही याचे पडसात उमतालर आहेत.शिर्डीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व धिरडी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदत गोळा करण्याचे काम सुरु आहे.दोन दिवसात मिळून एक लाख तीस हजार रुपयांच्या वर रक्कम जमवली गेली आहे.या मदतफेरी मध्ये शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांनी सहभाग घेतला आहे.याप्रसंगी ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पारख, रा. स्व. संघाचे विक्रम गोंदकर, जनकल्याण समितीचे डॉ. जितेंद्र शेळके, विठ्ठल जाधव, प्रा. संजय शिरडीकर, विधिज्ञ मनिलाल पटेल,अनिल शेजवळ, किशोर बोरावके, धनंजय जगताप, अमोल कटके, मयुर चोळके, नंदलाल मोटवानी, दिपक जानी, देवराम सजन, राधाकिसन शेटे, मेहुल जैन, सुनील राहाणे, आकाश बहिरम, चांगदेव कसबे, विजु सोनवणे, रवींद्र तारडे, सचिन सोनवणे, मनोज वाघ, सचिन औटी आदींनी परिश्रम घेतले