जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी-या आमदारांचे आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिक्षणासाठी,समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी समाजासाठी आपले आयुष्य वेचले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांनी दिलेला शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हा बहुमोल संदेश आपल्या जीवनाला नेहमीच दिशा देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड बुद्धिमत्तेचा महासागर होते.समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला आहे-आ.आशुतोष काळे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कॉ,”डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते असेही ते शेवटी म्हणाले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष गंगुले,नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,संतोष चवंडके,डॉ.अजय गर्जे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,माजी नगरसेवक दिनार कुदळे,कृष्णा आढाव,दिनकर खरे,फकीर कुरेशी,मायादेवी खरे,राहुल देवळलीकर,बाळासाहेब रुईकर,राजेंद्र खैरनार,डॉ.तुषार गलांडे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close