जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात तोंडावर औषध फवारून मोठी चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस सुमारे बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या प्रमोद रावसाहेब काथे यांच्या स्वयंपाक गृहाचा काल मध्यरात्री रात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास दरवाजा व कुलूप तोडून व त्यात झोपलेल्या इसमाच्या तोंडावर काहीतरी अज्ञात रसायन फवारून करण्यात आलेल्या चोरीत २ तोळे सोन्याचे गंठण,सोन्याचे झुबे,८ हजार रुपये रोख,व एक ओपो कंपनीचा भ्रमणध्वनी असा जवळपास ८० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने रांजणगाव देशमुखसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील काथे वस्ती येथील रहिवासी असून ते आपले शेतीसह अन्य दैनंदिन काम आटोपून काल दि.३० ऑगष्ट रोजी मध्यरात्री १२ ते आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ते झोपलेले आहेत हि संधी साधत त्यांच्या घराच्या मागील बाजूने असलेल्या स्वयंपाक गृहाचे कुलूप तोडून त्यातील त्यात झोपलेल्या इसमाच्या तोंडावर काही अज्ञात रसायन फवारून चोरी करण्यात आली आहे.तर रामनाथ गव्हाणे यांची हि चोरी झाली आहे मात्र रक्कम समजू शकली नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम हा कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील अंजनापूर रस्त्यावर सुमारे दीड कि.मी.अंतरावर काथे वस्ती येथील रहिवासी असून त्यांच्या घरात ते पती पत्नी,आई,वडील,मुलगा असा परिवार आहे.आपले शेतीसह अन्य दैनंदिन काम आटोपून काल दि.३० ऑगष्ट रोजी मध्यरात्री १२ ते आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ते झोपलेले आहेत हि संधी साधत त्यांच्या घराच्या मागील बाजूने असलेल्या स्वयंपाक गृहाचे कुलूप तोडून त्यातील त्यात झोपलेल्या इसमाच्या तोंडावर काही अज्ञात रसायन फवारून घरातील लोखंडी पेटी उचलून नेऊन नजीकच्या उसाच्या शेतात ती उचकटून त्या चोरीत २ तोळे सोन्याचे गंठण,सोन्याचे झुबे,८ हजार रुपये रोख,व एक ओपो कंपनीचा भ्रमणध्वनी असा जवळपास ८० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने रांजणगाव देशमुखसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याच चोरट्यानी नजीक असलेल्या रांजणगाव देशमुख व अंजनापूर शिवेवर असलेल्या अंजनापूर शिवारातही रामनाथ दादा गव्हाणे यांच्या वस्तीवरही चोरी केली असल्याची बातमी आहे.मात्र त्यात किती रक्कम गेली हे समजू शकले नाही.मात्र याबाबत त्यांनी शिर्डी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नाही.दरम्यान रांजणगाव देशमुख आणि परिसरात शिर्डी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थानी केली आहे.

शिर्डी पोलिसांनी या चोरी प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३८०/२०२२ भा.द.वि.कलम ३८०,४५७ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक कल्पेश दाभाडे या करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close