कोपरगाव तालुका
शहापूर हद्दीत इनोव्हा कारची दुचाकीस धडक,दोन जखमी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत हद्दीत म्हसोबा मंदिरानजिक आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दीपावली साजरी करून कोपरगाव कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या होंडा कंपनीची दुचाकी (क्र.एच.१४ एच.झेड.१०२४) हिला पुण्याकडून कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने (क्रं.एम.एच.१९ बी.यू.९१४६) जोराची धडक दिल्याने त्यात दोन दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या नागरिकांनी सरकारी रुग्ण वाहिणीला दूरध्वनी करून लोणी येथील ग्रामिण रुग्णालयात भरती केले आहे.दरम्यान या घटनेतील जखमींची नावे अद्याप निष्पन्न झाली नाही.व या बाबत अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत हे जखमी नेमके कोठले आहे हे स्पष्ट झालेले नाही.या बाबत पोलीस पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री माघाडे हे करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.घटनास्थळी नजीकच्या शहापुर ग्रामपंचायत हद्दीतील सरपंच खंडीझोड व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारार्थ लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.