जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दीपावली पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धा संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद कोपरगाव तालुका फोटोग्राफर असोसीएशन,कलाध्यापक संघटना,यांचे सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकाच्या घरासमोरील अंगणात नुकतेच करण्यात आले होते.या रांगोळी स्पर्धेस नागरिकांनी सलग आठव्या वर्षी प्रतिसाद दिला आहे.

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती,उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे,शुभ कार्याची सुरुवात म्हणून हे आहे.

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती,उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे,शुभ कार्याची सुरुवात म्हणून हे आहे.परंपरा,लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न असू शकते.हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे.साधारणता,सण,शुभ उत्सव,विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.त्याला स्पर्धात्मक कलेचे स्वरूप आता कोपरंगाव मध्ये आल्याचे दिसते आहे.

एकूण ६४ कला प्रकारात रांगोळी कलेला महत्व आहे.सूर्यतेज संस्थेचा कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व समावेशक करण्यासाठी बंदिस्त हॉल,रांगोळीचा ठराविक आकार,रंग संगती याचे बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र,सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत विविध प्रकारात कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या.प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक ठिकाणी कलेचे पदवीधर परीक्षण सहाय्यक,छायाचित्रकार,नोंदणी अधिकारी,संस्थेचे प्रतिनिधी,निरीक्षक,गाईड अशी ऑनलाइन १५ पथके तयार करून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करून व छायाचित्र हे सर्व परीक्षण संदर्भात अंतिम निर्णयासाठी कलेचे उच्च पदवीधर समिती कडे सुपूर्द करून त्याचा अंतिम निकाल प्रसार माध्यमाद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समिती प्रमुख कल्पना गीते यांनी दिली आहे.प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास कापसे पैठणी,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विशेष गुणवत्ता रांगोळीस भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेनिमित्त कोपरगावातील छोटया- छोटया रांगोळी विक्रेत्यांची मोठी विक्री झाली आहे.कोपरगावातील रांगोळी कलेत छोटया छोटया कलाकारांमध्ये दडलेले पैलू या निमित्त पहावयास मिळाले.ठिपके,संस्कार भारती,प्रबोधन,विविध निसर्ग व मानव निर्मित वस्तूंचा वापर करून तयार केलेली रांगोळी आणि कृष्णधवल रंगसंगती पासून सप्त रंगांची मुक्त उधळण केलेली रांगोळी मूळे रांगोली स्पर्धा वैशिठ्य पूर्ण ठरली.स्पर्धेचा शुभारंभ सूर्यतेजच्या प्रा.मसुदा दारूवाला यांनी कोरोना काळाचा प्रसंग साकारून कार्यगौरव केला आहे.या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य होता.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,प्रा.लता भामरे, प्रा.रश्मी जोशी,प्रा.कल्पना गीते,प्रा.मसुदा दारुवाला, अॅड.सौ.सिमा जोशी,प्रा.पल्लवी वदक (रुईकर),प्रा.अनिल अमृतकर,डॉ.नीलिमा आव्हाड, प्रा.पायल देवळालिकर,प्रा.ज्योती कोताडे,सुरेखा चिंचपुरे,सुरेखा आव्हाड,सीमा भिडे,प्रा.समीना बेग,प्रा.तेजल पगारे,प्रा.माधवी पेटकर,गीताभाभी बंब,प्रा.दर्शना हलवाई,प्रा.ऐश्वर्या बिडवे,प्रा.वंदना अलई,मनीषा धनवटे,प्रा.कविता बडोगे,पल्लवी भगत,कोमल गोडसे,जयश्री मोराणकर, प्रा.अमोल निर्मळ,प्रा.मानसी टिळेकर,बंडूनाना चिंचपुरे,महेश थोरात,रविंद्र भगत,अॅड.महेश भिडे,प्रा.अतुल कोताडे,प्रा.मतीन दारुवाला,चंद्रकांत चोपडे,दीपक येवले,मिलिंद जोशी,कल्पेश टोरपे,अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,नाट्य परिषद,कलाप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close