कोपरगाव तालुका
वाहतूक सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विजयादशमीचे औचित्य साधत शिवसेना प्रेणित वाहतूक सेनेची आज उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी इरफान शेख यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आल्याने त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वाहतूक सेना हि अत्यंत महत्त्वाची संघटना असून त्यांनी कोविड-१९ या महामारीच्या कालावधीत आपला जीव धोक्यात घालून अन्न,भाजीपाला,औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे तसेच आजारी असलेल्या रुग्णांचे देखील ने-आण करण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे-राजेंद्र झावरे,उत्तर नगर अध्यक्ष
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक सेनेचे काम बंद होते मात्र उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्याशी वाहतूक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी चर्चा करून पुन्हा कार्यरत होऊन काम करण्याची तयारी दाखवली होती.त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहतूक सेनेच्या मेळाव्यात इरफान शेख यांची वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी फेर निवड करण्यात आली आहे.तर कोपरगाव तालुका प्रमुख नवनाथ पेकले,उपप्रमुखपदी अविनाश धोक्रट,किरण कुऱ्हे,शहरप्रमुख जाफर सय्यद,उपशहरप्रमुख प्रवीण शेलार,राकेश वाघ व शिवसेनेच्या विभागप्रमुख पदी किरण अडांगळे,रामदास शिंदे या प्रमाणे निवड करण्यात आली आहे.
उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की,”वाहतूक सेना हि अत्यंत महत्त्वाची संघटना असून त्यांनी कोविड-१९ या महामारीच्या कालावधीत आपला जीव धोक्यात घालून अन्न,भाजीपाला,औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे तसेच आजारी असलेल्या रुग्णांचे देखील ने-आण करण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे.श्रीरामपूर, नेवासा येथील कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,राज्य परिवहन संघटनेचे कोपरगाव कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत मोरे,माजी शहराध्यक्ष अस्लम शेख,युवासेना सहसचिव सुनिल तिवारी,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भूषण पाटणकर,आकाश कानडे,गगन हाडा, विक्रांत झावरे,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सहंघटक वैभव गिते,विभागप्रमुख विजय शिंदे,अशोक पवार,अल्ताब सय्यद,शैलेश वाघ,समीर शेख,विशाल झावरे,वैभव हलवाई,अविनाश वाघ,प्रतीक इंगळे,आकाश लोणारी नवनाथ संवत्सरकर समीर पठाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी केले व आभार उपशहरप्रमुख गगन हाडा यांनी मानले आहे.